Share

ममता बॅनर्जींचे पोलिसांना निर्देश, मोहन भागवत जेव्हा बंगालमध्ये येतील तेव्हा त्यांना मिठाई द्या पण..

आरएसएस प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या बंगाल दौऱ्यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी (Mamata Banerjee) बैठक घेतली होती. ही बैठक सुरक्षा व्यवस्थेबाबत होती. बैठकीत ममता यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले आणि ऑर्डरसह एक गोष्ट सांगितली. त्या म्हणाल्या की, मोहन भागवत बंगालच्या दौऱ्यावर येत आहेत. पण या दौऱ्यामागचा अजेंडा काय आहे? त्यांना पूर्ण संरक्षण द्या, पण तुम्ही ही देखील काळजी घ्या की जेणेकरून ते दंगल भडकवू शकणार नाही.(Mohan Bhagwat, Mamata Banerjee, RSS, Dangal)

खरं तर, मोहन भागवत १७ मे ते २० मे या कालावधीत बंगालच्या पश्चिम मेदिनीपूरमधील केशियारी गावाच्या दौऱ्यावर आहेत. येथे भागवत संघ शिक्षण वर्गात सहभागी होतील. एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, या कार्यक्रमात हजारो स्वयंसेवकांना शारीरिक आणि बौद्धिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. आरएसएस दरवर्षी वेगवेगळ्या शहरांमध्ये असे संघ शिक्षण वर्ग आयोजित करत आहे. यावेळी ते पश्चिम बंगालमध्ये असतील आणि मोहन भागवत स्वतः त्यात शामिल होणार आहेत.

3 1024 555 072919122129

दरम्यान, ममता बॅनर्जी याही तीन दिवसांच्या पश्चिम मेदिनीपूर दौऱ्यावर होत्या. तिथल्या प्रशासकीय बैठकीत ममता यांनी भागवत यांच्या दौऱ्यावर सविस्तर माहिती दिली. ममता यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, शक्य असल्यास मोहन भागवतांना मिठाई पाठवा. हे माहित असले पाहिजे की आम्ही आमच्या पाहुण्यांची काळजी घेतो. मात्र जास्त उठाठेव करू नका अन्यथा,  त्याचा चुकीचा फायदा घेतील.

ममतांचे वक्तव्य समोर आल्यानंतर पश्चिम बंगालमधील भाजप नेते दिलीप घोष यांनी प्रतिक्रिया दिली आहे. घोष म्हणाले, मोहन भागवत हे हिंदू समाजाचे नेते आहेत आणि ते हिंदूंच्या हितासाठी काम करतात. सोसायटीच्या उभारणीसाठी ते कार्यरत आहेत आणि ममता बॅनर्जी अगदी उलट करत आहेत. त्या कायदा मोडत आहेत. न्यायालय आणि संविधानाचे पालन करत नाहीत. मोहन भागवत यांच्यासारख्या आदरणीय व्यक्तीला असे बोलणे मान्य नाही.

मोहन भागवत यांच्या या बंगाल भेटीचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, बंगालमध्ये हिंसाचार आणि कोरोनामुळे आरएसएसच्या अनेक शाखा बंद करण्यात आल्या होत्या. बातमीनुसार, मार्चपर्यंत सर्व शाखा पुन्हा सुरू कराव्यात, असे आदेश भागवत यांनी दिले होते. पश्चिम बंगालमध्ये RSS च्या १८०० पेक्षा जास्त शाखा असल्याचं म्हटलं जातं.

महत्वाच्या बातम्या-
द्वेष आणि हिंसाचार पसरवण्यासाठी कश्मीर फाइल्ससारखे चित्रपट बनवले जातात, ममता बॅनर्जीच वादग्रस्त वक्तव्य
तेव्हा ममता बॅनर्जींनी मला फोन केला आणि म्हणाल्या; शरद पवारांनी सांगितला नवाब मलिकांच्या  अटकेनंतरचा ‘तो’ किस्सा
भाजपला उलथवून टाकणे ही वाईट कल्पना, राजकीय आघाडीची गरज नाही, केसीआरचा बदलला सुर, ममताही झाल्या शांत
फक्त ‘ही’ अट पुर्ण करा पेट्रोल डिझेल पुर्णपणे करमुक्त करतो; मुख्यमंत्र्यांचे मोदींना आव्हान

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now