देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांचे नेतृत्व करावे असा प्रस्ताव या बैठकीत मांडण्यात आला. या बैठकीला स्वतः शरद पवार देखील उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांनी शरद पवार यांना संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्ष म्हणून निवडावे हा प्रस्ताव मांडला.
पवारच देशातील विरोधकांना एकत्र आणू शकतात आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपाला रोखले जाऊ शकते, असे या ठरावात म्हटले आहे. मात्र यावरून राजकारण रंगले आहे. काँग्रेस नेतृत्व करु शकत नाही, असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे म्हणणे आहे. या ठरावानंतर आता काँग्रेस काय भूमिका घेतात देतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
‘युपीए’च्या अध्यक्षपदासाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा असताना आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे. यूपीएचं नेतृत्व बदलायचं असेल तर ममता बॅनर्जींशिवाय दुसरी कोणतीही योग्य व्यक्ती दिसत नाही असं मत प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलंय.
ते याबाबत माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना आंबेडकरांनी काश्मीर फाईल्स या चित्रपटाबद्दल देखील सविस्तर मत मांडले. ‘इतिहासकारांनी देखील या चित्रपटावर प्रतिक्रिया द्यावी. म्हणजे खरं सत्य बाहेर येईल. काश्मीरमध्ये आता ही इतर हिंदू राहता आहे. मग ते का नाही सोडून आले फक्त काश्मीरी पंडित का? या बद्दल माहिती द्यावी, असे आंबेडकर म्हणाले.
दरम्यान, यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ‘शरद पवार अनेक तरूणांना आपलेसे वाटतात. युपीएच अध्यक्षपद त्यांनी भूषवावं असं अनेकांना वाटतं. परंतु, युपीएतील घटक पक्षातील वरिष्ठ नेते यासंदर्भातील अंतिम निर्णय घेतील, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.