Share

मविआ’त बिघाडी! यापुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार; बड्या शिवसेना नेत्याची घोषणा

शिवसेनेतील आमदारांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालं. मात्र, आता शिवसेनेतील ४० आमदारांच्या बंडखोरीनंतरही महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद थांबायला तयार नसल्याचं चित्र दिसत आहे.

नाशिकमधील शिवसेनेचे माजी आमदार योगेश घोलप यांनी राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार सरोज आहिरे यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत आगामी स्थनिक स्वराज्य संस्था निवडणुका असो किंवा कोणत्याही निवडणुका असो त्या स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.

बबनराव घोलप यांचे योगेश घोलप हे सुपुत्र आहेत. खासदारांच्या बंडखोरीनंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून ज्या बबन घोलपांना उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत, त्याच बबन घोलपांचे पुत्र योगेश घोलप आहेत.

योगेश घोलप यांनी अशा प्रकारे नाराजी व्यक्त केल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडीला सुरुवात झाली का असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. त्यामुळे पुढे काय होईल पहावं लागेल.

दरम्यान, दुसरीकडे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत यांना विशेष ईडी न्यायालयाने ४ ऑगस्ट पर्यंत कोठडी सुनावली आहे. पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने केलेल्या तपासात प्रथमदर्शीनी राऊतांचा सहभाग असल्याचं आढळून येत असल्याचं न्यायाधिशांनी सांगितलं.

वकील हितेन वेणेगावकर यांनी गंभीर आरोप केला आहे की, प्रविण राऊत पत्रा चाळीची डेव्हलपमेंट पाहता होता. त्याला HDIL कडून ११२ कोटी रुपये मिळाले. त्यातले १ कोटी ६ लाख ४४ हजार वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. संजय राऊत आणि वर्षा राऊत यांना परत प्रविण राऊतने ३७ कोटी दिले, नंतर त्यातून त्यांनी दादरमध्ये फ्लॅट घेतला. तसेच अलिबागची जमीनही विकत घेण्यात आली.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now