हृदय पिळवटून टाकणारी घटना! बाप-लेकाचा ट्रकखाली चिरडून मृत्यू; घटना कॅमेऱ्यात कैद

राज्यात अपघातांची मालिका काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीये. राज्यात अनेकांनी अपघातात आपले जीव गमावले आहेत. अशाच एक धक्कादायक अपघात मालेगाव येथे झाला आहे. या अपघातात बाप – लेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. यामुळे कुटुंबियांवर दु: खाचा डोंगर कोसळला आहे.

तर परिसरात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे. हा भीषण अपघात मालेगाव-नामपूर मार्गावर झाला आहे. मालेगाव-नामपूर मार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या भीषण अपघातात बाप – लेकाचा मृत्यू झाला.

दरम्यान, सीसीटीव्हीत दिसत आहे की, भरधाव ट्रक दुचाकीला धडक देतो आणि त्यानंतर दुचाकीवरील दोघेही खाली कोसळतात. दोघेही खाली कोसळल्यानंतर त्यांच्या अंगावरुन ट्रकचा मागील टायर गेल्याने बाप-लेकांचा जागीच मृत्यू झाला आहे. बापू मनोर आणि पप्पू बापू मनोर अशी मृतकांची नावे आहेत.

मंगळवारी (दि. ८) रोजी सकाळी हा भीषण अपघात झाला. नामपूर – मालेगाव रस्त्यावर निळगव्हाण शिवारात म्हशी भरून जात असलेल्या मालवाहू ट्रक (क्र. एक्स ६६८६) हिने दुचाकीला धडक दिली. मिळालेल्या माहितीनुसार, बापू मनोर आणि पप्पू बापू मनोर हे मालेगाव येथून नामपूरला घरी जात होते.

याचदरम्यान हा भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. नागरिकांनी तातडीने दोघांना रुग्णालयात दाखल केले होते. मात्र त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तसेच अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला आहे. पोलिस या प्रकरणी तपास करत असून वडणेर खाकुर्डी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीच एका टेम्पोचे ब्रेक फेल झाल्यामुळे या रस्त्यावर भीषण अपघात झाला होता. या अपघातात 4 जण जागीच ठार झाले होते. तर आणखी 2 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. पुन्हा मंगळवारी याच रस्त्यावर भीषण अपघात झाला. आणि या अपघातात बाप-लेकाचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
४०० करोडचे मालक असलेल्या अनुपम खेर यांनी एकदा मंदिरातून चोरले होते ११८ रुपये, आईने दिली होती कानाखाली
महिलेला मधलं बोट दाखवणाऱ्या इंजिनिअरला बेदम मारहाण, वाचा संपूर्ण प्रकरण
मुख्यमंत्री साहेब..! शेती परवडत नाही, वाईन विकण्याची परवानगी द्या; शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
विधानसभा निवडणूक निकालानंतर पेट्रोल-डिझेलच्या किमतीत होणार वाढ? काय म्हणाले पेट्रोलियम मंत्री…