Share

लैंगिक शोषणाचा आरोप झालेल्या प्रसिद्ध अभिनेत्याने दिला ‘AMMA’ चा राजीनामा; म्हणाला, निर्दोष सिद्ध होईपर्यंत..

Vijay Babu

मल्याळम अभिनेता आणि निर्माता विजय बाबू (Vijay Babu) मागील काही दिवसांपासून माध्यमात फारच चर्चेत आहे. विजय बाबूवर एका महिलेने लैंगिक अत्याचाराचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता विजय बाबू पुन्हा एका कारणामुळे चर्चेत आला आहे. विजय बाबूने ‘असोसिएशन ऑफ मल्याळम मूव्ही आर्टिस्ट्स’ (AMMA) च्या कार्यकारी समितीचा राजीनामा दिला आहे.

समोर येत असलेल्या बातम्यानुसार, विजय बाबूने ‘अम्मा’ला एक पत्र पाठवला आहे. त्यामध्ये त्याने ‘AMMA’ ची कार्यकारी समिती सोडत असल्याचे म्हटले आहे. तसेच जोपर्यंत त्याच्यावरील आरोप खोटे असल्याचे सिद्ध होत नाही तसेच तो निर्दोष म्हणून सिद्ध होत नाही तोपर्यंत तो समितीपासून दूर राहणार असल्याचे म्हटले आहे.

यासंदर्भात ‘AMMA’ चे महासचिव एडावेला यांनी एक निवेदन जारी करत सांगितले की, ‘विजय बाबूने ‘AMMA’ ला एक पत्र पाठविले आहे. त्यामध्ये विजय बाबूने म्हटले की, त्याच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांमुळे तो समितीला बदनाम करू इच्छित नाही. त्यामुळे जोपर्यंत तो निर्दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत तो कार्यकारी समितीपासून दूर राहणार आहे. त्याच्या या पत्राबाबत ‘AMMA’ च्या अधिकाऱ्यांद्वारा चर्चा करण्यात आली असून त्याचा राजीनामा स्वीकार करण्यात आला आहे’.

दुसरीकडे केरळ उच्च न्यायालयाने लैंगिक शोषण प्रकरणात विजय बाबूच्या अटकपूर्व जामीन याचिकेबाबत विचार करण्यास शुक्रवारी नकार दिला होता. विजय बाबूचे म्हणणे आहे की, ज्या महिलेने त्याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली, ती महिला त्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहे.

विजय बाबूने याचिकेत म्हटले की, ‘वास्तविक परिस्थिती ही आहे की, कोणतीही व्यक्ती प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणाही व्यक्तीविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप लावू शकते. आणि याद्वारे लोकप्रिय व्यक्तींची प्रतिमा खराब करण्याचा त्यांचा हेतू असतो. तसेच पोलीसही माध्यमांच्या दबावामुळे मला अटक करून चॅप्टर बंद करू इच्छित आहेत, असेही त्याने याचिकेत म्हटले आहे.

दरम्यान, विजय बाबू मल्याळम सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने त्याच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. अभिनयासोबत तो चित्रपटांची निर्मितीही करत असे. विजय बाबूची ‘फ्रायडे फिल्म हाऊस’ नावाची स्वतःची एक निर्मिती संस्थासुद्धा आहे. निर्माता म्हणून त्याला अनेक पुरस्कारसुद्धा मिळाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :
पुन्हा टॉलिवूडने बॉलिवूडला झोपवलं, KGF 2 ने रचला इतिहास, ‘अशी’ कामगिरी करणारा ४ था चित्रपट
शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘या’ OTT प्लॅटफॉर्मसोबत केला करार, किंमत वाचून थक्क व्हाल
अनुष्का-विराटने शिकवलं खुल्लम खुल्ला प्रेम कसं करायचं, पहा व्हायरल झालेले १० रोमँटिक फोटो

बाॅलीवुड ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now