मल्याळम अभिनेता आणि निर्माता विजय बाबू (Vijay Babu) सध्या माध्यमात फारच चर्चेत आहे. एका महिलेने विजयबाबूवर लैंगिक शोषणाचा आरोप लावला आहे. तसेच यासंदर्भात महिलेने विजयबाबूविरोधात एर्नाकुलम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महिलेच्या या आरोपानंतर विजयबाबू सोशल मीडियावर लाईव्ह येत आपली बाजू मांडली आहे.
विजय बाबूने बुधवारी रात्री फेसबुकवर लाईव्ह येत तो स्वतःच पीडित असल्याचे म्हटले आहे. तसेच यावेळी विजयने देशाच्या कायद्यांवरही आपला राग व्यक्त केला. त्याने म्हटले की, या देशाचा कथित कायदा त्या महिलेला वाचवत आहे. ती महिला आरामात आहे आणि मी त्रस्त आहे.
विजय बाबूने म्हटले की, ‘मी कोणतीही चूक केली नाही त्यामुळे मला घाबरण्याची काही गरज नाही. मला ‘मीटू’ आरोपासंबंधित देशातील कायदे माहित आहेत. या महिलेच्याविरोधात मी कायदेशीर कारवाई करणार आहे. तसेच मी मानहानीचा खटलासुद्धा दाखल करणार आहे. आणि हा काही छोटा-मोठा खटला असणार नाही’.
विजयने पुढे म्हटले की, ‘मी निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी माझ्याजवळ सर्व रेकॉर्ड्स आहेत. मी त्या महिलेला २०१८ साली भेटलो होतो. आणि २०१८ पासून ते २०२१ पर्यंत आमच्यात कोणतेच बोलणे झाले नाही. माझ्याजवळ चॅटिंगचे अनेक स्क्रिनशॉट्स आहेत’, असेही विजय बाबूने यावेळी म्हटले.
रिपोर्ट्सनुसार, फेसबुक लाईव्हदरम्यान विजय बाबूने तक्रारदार महिलेचे अनेकवेळा नाव घेतले. त्यामुळे पोलिसांनी बुधवारी विजय बाबूच्याविरोधात तक्रारदात्याचे नाव उघड केल्याबद्दल आणखी एक खटला दाखल केला आहे. तसेच आता पोलीस विजय बाबूला अटक करत पुढील कारवाई करणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
https://twitter.com/ANI/status/1519374499891671041?s=20&t=CMzkP1mELyk19axDWZ9eLw
दरम्यान, विजय बाबू मल्याळम सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने त्याच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. अभिनयासोबत तो चित्रपटांची निर्मितीही करत असे. विजय बाबूची ‘फ्रायडे फिल्म हाऊस’ नावाची स्वतःची एक निर्मिती संस्थासुद्धा आहे. निर्माता म्हणून त्याला अनेक पुरस्कारसुद्धा मिळाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
‘या’ बाॅलीवूड अभिनेत्रींनी खुलेआम दिले होते प्रचंड हाॅट न्युड सीन्स; पाहून प्रेक्षकांचा सुटला होता ताबा
Avatar 2 trailer | तब्बल १३ वर्षातून एक चित्रपट, बजेट ७५०० कोटी; कमाई रेकॉर्ड मोडणार का?
शेणाने जमीन सारवताना अभिनेत्रीची झाली अशी अवस्था, व्हिडिओ पाहून हसू आवरणार नाही