Share

सलमानच्या नाकावर टिच्चून त्याच्यासमोर प्रचंड बोल्ड अवतारात मलायकाची हवा, सलमान बघतच राहीला…

बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री मलायका अरोरा ही नेहमीच तिच्या ड्रेसिंगमुळे चर्चेत येत असते. तिच्या हटके स्टाईल आणि बोल्ड लूकमुळे ती अनेकदा तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. अशात पुन्हा एकदा मलायकाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. (malaika salman karan johar party)

मलायकाने पुन्हा एकदा असे काही केले, ज्यामुळे ती सर्वांच्या नजरेत आली. बुधवारी रात्री करण जोहरने त्याच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त एका ग्रँड पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत जवळपास सर्वच प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्स पोहोचले होते. पण अनेकदा आपल्या ड्रेसिंग सेन्सने सर्वांचे लक्ष वेधून घेणारी मलायका अरोरा तिच्या विचित्र फॅशन सेन्समुळे नेटिझन्सच्या निशाण्यावर आली आहे.

या पार्टीत मलायकाने असा ड्रेस घातला होता की लोकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली. बॉलीवूड निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरच्या या सेलिब्रेशनमध्ये बॉलिवूडचे सर्व सेलिब्रिटी एकापेक्षा एक ग्लॅमरस लूकमध्ये पोहोचले. पण मलायका सिझलिंग अवतारात पार्टीमध्ये दिसून आली.

मलायका या पार्टीत निऑन ग्रीन कलरचा ब्लेझर आणि शॉर्ट्स परिधान करताना दिसली होती, ज्यासोबत तिने जांभळ्या रंगाचा ब्रॅलेट घातला होता. अशा हॉट लूकमध्ये पोहोचल्यानंतर, अभिनेत्रीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले, परंतु नेटकऱ्यांना तिचा बोल्ड लूक अजिबात आवडला नाही असे दिसते.

या कामुक लूकमुळे मलायकाला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे. काही सोशल मीडिया यूजर मलायकाच्या ड्रेसिंग सेन्सची खिल्ली उडवत असताना अनेकांनी तिला वल्गर म्हटले आहे. तर एकाने मलायका टॉप घालायला विसरल्याचेही सांगितले. तिचा ड्रेस पाहून एका यूजरने लिहिले की, गरजेचे कपडे घरी ठेवून आली का?

दरम्यान, नुकतेच मलायका अरोराने अर्जुन कपूरसोबतच्या नात्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. या विधानानंतर लोकांचा अंदाज आहे की दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. रिपोर्ट्सनुसार हे कपल या वर्षाच्या अखेरीस एकमेकांशी लग्न करणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
राम चरणच्या अलिशान लाईफस्टाईल पुढे बॉलिवूड सुद्धा पडेल थंड, वर्षाला कमवतो तब्बल ‘इतके’ कोटी
भारतात आहे जगातील सर्वात श्रीमंत गाव, गावकऱ्यांच्या खात्यावर आहेत करोडो रूपये जमा; वाचा पुर्ण माहिती
…ते शरद पवारांना कोणीतरी चुकीचं सांगितलं असेल, पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now