मागील 2 एप्रिल रोजी बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचा एका फॅशन इव्हेंटवरुन मुंबईला येताना अपघात झाला होता. या अपघाताच तिला किरकोळ दुखापत झाली असल्यामुळे ती घरीच आराम करत होती. या मधल्या काळात मलायका सोशल मिडीयापासून पूर्णपणे लांब होती. पण आता बऱ्याच दिवसानंतर मलायकाने एक पोस्ट लिहित डॉक्टर, कुटुंब आणि काळजी करणाऱ्या व्यक्तींचे आभार मानले आहेत.
तसेच तिने चाहत्यांना आपल्या तब्येतीत सुधारणा झाली असल्याची माहिती दिली आहे. आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये मलायकाने म्हटले आहे की, गेल्या काही दिवसात ज्या घटना घडल्या आहेत त्या खूपच धक्कादायक होत्या. भूतकाळात विचार करणे हे एखाद्या चित्रपटातील भयानक दृश्यासारख वाटत आहे.
पुढे तिने म्हटले आहे की, या अपघातनंतर मला असे वाटले की, एक शक्ती माझे रक्षण करत आहे. मला रुग्णालयात पोहोचण्यास मदत करणारे लोक असोत, माझे कुटुंब असो जे माझ्या पाठीशी उभे राहिले आणि रुग्णालयातील कर्मचारी असो.
यानंतर मलायकाने सर्वांचे आभार मानत, माझ्या डॉक्टरांनी प्रत्येक गोष्टीत शक्य तितका काळजी घेण्याचा प्रयत्न केला. आता मला बरे वाटत आहे. माझे मित्र, कुटुंब, माझी टीम आणि माझ्या इंस्टा फॅमकडून मिळालेले प्रेमाबद्दल मी आभारी आहे. अशी माहिती आपल्या तब्येतीविषयी दिली आहे.
तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स करत प्रकृतीविषयी विचारपूस केली आहे. तसेच तिला लवकर बरे होऊन सोशल मिडियावर ॲक्टिव होण्यास सांगितले आहे. अपघातानंतर मलायकाने आपले कोणतेच ग्लॅमरल फोटो सोशल मिडीयावर शेअर केले नाहीत. त्यामुळे तिला पुन्हा पूर्वीसारखे बघण्यासाठी चाहते आतूरलेले आहेत.
दरम्यान एका फॅशन इव्हेंटवरुन येताना मलायकाचा मुंबईजवळील पनवेल भागात अपघात झाला होता. तिला त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी मलायकाला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. यानंतर तिला बेड रेस्ट घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता.आता मलायका पूर्णपणे बरी झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
अनिल देशमुख यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालये ईडीला फटकारत दिले ‘हे’ आदेश
”शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यात संजय राऊतांचाच हात तर नाही ना?”
उदयनराजे संध्याकाळी कोणत्या परिस्थितीत बोलले हे तपासलेे पाहिजे, जयंत पाटलांचा सणसणीत टोला
एकेकाळी दातांचे डॉक्टर असलेले गुणरत्न सदावर्ते कसे झाले हायकोर्टातील वकील? जाणून घ्या प्रवास