Share

मलायका अरोराच्या गाडीला भीषण अपघात; 3 गाड्या एकमेकांवर आदळल्या, दुखापत झाल्याने अभिनेत्री रुग्णालयात दाखल

अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या बाबत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. काल म्हणजेच शनिवारी तिच्या गाडीचा खालापूर टोल नाक्याजवळ अपघात झाला आहे. या अपघातात मलायकाला दुखापत झाली असून तिला उपचारासाठी नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

तिच्या गाडीत ड्रायव्हर आणि तिचा बॉडीगार्ड होता मात्र तिच्या बॉडीगार्डला काहीही दुखापत झाली नसून मलायकाला दुखापत झाली आहे. तर तिच्या गाडीचे समोरून मोठे नुकसान झाले आहे. तिची गाडी एका स्विफ्ट कारवर आदळली, म्ह्णून ती या अपघातात किरकोळ जखमी झाली.

घडलेली सविस्तर घटना म्हणजे, काल गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच मुंबईत शिवाजी पार्क येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील मनसैनिक आले होते. या मेळाव्याला येणाऱ्या मुंबईत येणाऱ्या मनसैनिकांच्या गाड्यांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक झालं होतं.

या ट्रॅफिकमुळेच अचानक ब्रेक लागल्याने तीन ते चार गाड्या एकमेकांवर आदळल्या. यामध्ये मलायका अरोरा हिच्या गाडीचा देखील समावेश होता. यावेळी, मलायकाच्या गाडीत मलायकासह तिचा ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड होता. या अपघातात ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड एकदम सुखरूप आहेत.

https://twitter.com/ANI/status/1510297391660150784?t=-g1in-U52DupiVq3lFnvLg&s=19

काल साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर मनसे जनहित कक्षाचे सरचिटणीस जयराज लांडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मलायकाला उपचारासाठी नवी मुंबईमधील अपोलो रुग्णालयात दाखल केले. सध्या तिची प्रकृती स्थिर असून, तिला आज घरी सोडलं जाईल.

दरम्यान, मलायका अरोराला तात्काळ रुग्णालयात दाखल करणाऱ्या मनसेच्या जनहित संघटनेचे सरचिटणीस जयराज लांडगे यांचे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे. मलायकाच्या अपघात झालेल्या गाडीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मलायकाच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे.

इतर

Join WhatsApp

Join Now