बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या फिटनेसमुळे आणि लूकमुळे नेहमी माध्यमात चर्चेत असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक सिझलिंग फोटो शेअर करत नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. आताही मलायकाचा एक फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या फोटोत तिने बॅकलेस ड्रेस परिधान केलेली दिसत आहे. परंतु, तिच्या या ड्रेसची दोरी कोणीतरी खेचताना दिसत आहे.
मलायकाचा व्हायरल होणारा फोटो हा एका जुन्या पार्टीदरम्यानचा आहे. यामध्ये मलायका अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चनसोबत दिसत आहे. दोघीही या फोटोत कॅमेऱ्याला पोझ देताना दिसून येत आहेत. श्वेता बच्चन या फोटोत आपल्या लूकद्वारेच चाहत्यांना घायाळ करत आहे. तर मलायकाचा हॉट अंदाज या फोटोत दिसून येत आहे.
तर या फोटोद्वारे तुमच्या लक्षात आलंच असेल की, मलायकाच्या ड्रेसची दोरी खेचणारी ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून श्वेता बच्चन आहे. अनेक दिवसांनी मलायका आणि श्वेताचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोवर अनेकजण विविध कमेंट करताना दिसून येत आहेत.
याशिवाय मलायकाचा दुसरा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्येही मलायका बॅकेलस ड्रेसमध्ये दिसत असून ती मिरर सेल्फी घेताना दिसून येत आहे. ब्लॅक रंगाचा बॅकलेस ड्रेस, त्यावर मोकळे सोडलेले सिल्की केस आणि चेहऱ्यावर न्यूड मेकअप अशा अंदाजात मलायका एखाद्या बार्बी डॉलसारखे दिसून येत आहे.
नुकतीच काही दिवसांपूर्वी मलायकाच्या कारचा अपघात झाला होता. या अपघातात मलायकाला जखमी झाली होती. त्यानंतर ती बाहेर जास्त दिसली नाही. परंतु काही दिवस आराम केल्यानंतर तिने पुन्हा कामास सुरुवात केली आहे. अपघातानंतर मलायका पहिल्यांदाच रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या रिसेप्शन पार्टीत दिसली होती.
महत्त्वाच्या बातम्या :
कंगनाचे लहानपणी झाले होते लैंगिक शोषण; स्वत:च खुलासा करत म्हणाली, एक मुलगा मला वाईट पद्धतीने..
‘त्या’ वादानंतर सलमान खानने उद्ध्वस्त केले अरिजित सिंगचे करिअर, वाचा नेमकं काय घडलं होतं?
‘हा’ व्यक्ती बनवणार सलमान खानला मोठा नेता, आता सलमान खान करणार राजकारण?