मलायका अरोरा आणि अरबाज खान ही जोडी बॉलिवूडमधील सुपरहिट जोडींपैकी एक होती. दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. दोघांनी एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. दोघांचे नाते बरेच दिवस टिकले पण एक वेळ अशी आली जेव्हा दोघांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.(malaika-arora-had-opened-arbaaz-khans-poll-in-front-of-everyone-even-the-fans-were-shocked)
आता बऱ्याच काळानंतर मलायकाचे जुने व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये मलायका(Malaika) अरबाजबद्दल काही रंजक खुलासे करताना दिसत आहे. जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये मलायका काय म्हणाली आहे. मलायका आणि अरबाज(Arbaaz)ला एका चॅट शो दरम्यान विचारण्यात आले कि, त्यांना एकमेकांबद्दल सर्वात जास्त कोणती गोष्ट आवडते?
जे ऐकल्यानंतर अरबाज म्हणाला होता, मलायका तिची चूक कधीच मान्य करत नाही आणि मला ही सवय अजिबात आवडत नाही. त्याचवेळी हा प्रश्न ऐकल्यानंतर मलायका म्हणाली की, मलाही अरबाजची ही सवय अजिबात आवडत नाही की तो त्याची कोणतीही वस्तू कुठेही ठेवतो आणि त्याला त्याच्या वस्तूंची अजिबात माहिती नसते.
घटस्फोट झालेला नसताना ही गोष्ट घडली. त्यांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोकांनाही तो खूप आवडत आहे. अरबाज इटालियन मॉडेल जॉर्जिया एंड्रियानी(Georgia Andriani)ला डेट करत आहे, तर मलायका अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.