Share

करण जोहरच्या पार्टीत टॉप घालायला विसरली मलायका, बेधडकपणे ब्रा घालून केलं फ्लॉन्ट

चित्रपट निर्माता, राइटर आणि अभिनेता करण जोहरने त्याचा 50 वा वाढदिवस साजरा केला. या पार्टीत बॉलीवूडचे जवळपास सर्वच स्टार्स पोहोचले होते, पण सगळ्यात जास्त कोणाची दखल घेतली गेली असेल तर ती मलायका अरोरा या अभिनेत्रीची. होय, या पार्टीसाठी तिने असा ड्रेस घातला होता की लोकांनी तिला अतिशय वाईटरित्या ट्रोल करण्यास सुरुवात केली.(malaika-arora-forgets-to-wear-top-at-karan-johars-birthday-party)

मलायका अरोरा नुकतीच करण जोहरच्या(Karan Johar) पार्टीत पोहोचली होती, ज्यासाठी तिने एक आउटफिट निवडला होता जो तिच्या ट्रोल होण्याचे कारण बनला होता. मलायकाने बोल्ड दिसण्यासाठी असा लुक केला होता कि, आजूबाजूचे लोक आश्चर्यचकित झाले. तिने ब्राइट ग्रीन कलरचे शॉर्ट्स आणि कोट घातला होता. अभिनेत्रीने त्याच्या आत ब्राइट पिंक कलरची  ब्रा घातली होती, ज्यामध्ये ती फ्लॉंट करताना दिसत होती.

मलायका अरोराच्या(Malaika Arora) या लूकमध्ये तिची हील्स देखील चर्चेत होती. तिने ब्राइट पिंक कलरची हील्स घातली होती. ज्याने लोकांचे लक्ष वेधून घेतले. या पार्टीत मलायका तिची बहीण अमृता अरोरा आणि मैत्रिण करीना कपूरसोबत पोहोचली होती आणि सैफ अली खान या तिन्ही लेडीजला सुरक्षितपणे पार्टीत घेऊन आला होता.

मलायकाच्या या पार्टी लुकला लोक खूप ट्रोल केले जात आहे. मलायकाच्या ड्रेसिंग सेन्सची(Dressing sense) कुणी खिल्ली उडवली तर कुणी तिला वल्गर म्हटले. मलायका टॉप घालायला विसरली असेही एकाने सांगितले. मलायका अरोरा रोजच चर्चेत असते. नुकतेच तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे काही बिकिनी फोटो शेअर केले आहेत, ज्यामुळे इंटरनेटचा पारा चांगलाच चढला आहे.

याशिवाय मलायका अरोराने यापूर्वी अर्जुन कपूरसोबतच्या तिच्या नात्याबद्दल एक मोठे वक्तव्य केले होते, ज्यानंतर लोक त्यांच्या लवकर लग्नाबाबत अंदाज लावू लागले होते. या वर्षाच्या अखेरीस हे कपल लग्न करणार असल्याचीही बातमी आहे.

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now