कतरिना कैफ – विकी कौशल आणि आलिया भट्ट- रणबीर कपूर यांच्या लग्नानंतर आता बॉलिवूड आणखी एका सेलिब्रेटीच्या लग्नासाठी सज्ज झाला आहे. ती जोडी म्हणजे अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा होय. आता हे दोघे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे कळत आहे.
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा सध्या बॉलीवूडचं सर्वात जास्त चर्चेत असलेलं कपल आहे. कैतरीना- विक्की, आलिया – रणबीरच्या लग्नानंतर आता चाहत्यांना अर्जुन आणि मलायकाच्या लग्नाचे वेध लागले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मलायका आणि अर्जुन यावर्षीच लग्नाच्या बंधनात अडकण्याची शक्यता आहे.
मलायका आणि अर्जुन एकमेकांना डेट करत चार वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. आता हे कपल त्यांच्या नात्याला नाव देण्याच्या तयारीत आहे. वृत्तानुसार, अर्जुन आणि मलायका 2022 च्या अखेरीस लग्नबंधनात अडकणार आहेत. माहितीनुसार, येत्या नोव्हेंबर अथवा डिसेंबरमध्ये ते लग्न करण्याचा घाट घालणार आहेत.
माहितीनुसार, जास्त गाजावाजा न करता अगदी साधेपणाने हे लग्न होण्याची शक्यता आहे. विक्की- कतरिना आणि रणबीर- आलियाप्रमाणेच हे लग्नही सिक्रेट पद्धतीने केलं जाणार आहे. लग्नाच्या चर्चा सुरु होताच अर्जुनने त्याच्या इन्स्टा पोस्टमधून याबाबत हिंटसुद्धा दिली आहे. त्यामुळे आता या चर्चेला आणखी उधाण येण्याची शक्यता निर्माण होत आहे.
चर्चा आहे की, हे लग्न अगदी सध्या पद्धतीने केले जाणार आहे. हा मलायकाचा निर्णय असल्याचे सांगण्यात येत आहे. अभिनेता अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्यावर आता मलायका दुसऱ्यांदा लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. म्हणून कदाचित तिला लग्नाचा गाजावाजा करायचा नाही.
दोघांनाही भव्य दिव्य म्हणजे आलिशान लग्नाचा थाटमाट करण्याची इच्छा नाही. त्यामुळे साधेपणाने म्हणजेच रजिस्टर मॅरेज करून मित्रमंडळी आणि जवळच्या नातेवाईकांना फक्त ग्रॅंड पार्टी दिली जाणार आहे. नातेवाईकांमध्ये कपूर घरातील सर्व नातेवाईक आणि मलायकाकडून तिचे आईवडील आणि बहिणीचं कुटुंब लग्नात आमंत्रित असेल अशी माहिती मिळत आहे.