बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि तिचा माजी पती अरबाज खान (Malaika Arora And Arbaaz Khan)सध्या माध्यमात चर्चेत आहेत. नुकतीच रविवारी ते दोघे विमानतळावर एकत्र दिसले. मलायका आणि अरबाज त्यांचा मुलगा अरहानला सोडायला विमानतळावर पोहोचले होते. यादरम्यानचा त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोक मात्र, दोघे भांडण करत आहेत का? असा प्रश्न विचारत आहेत.
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी मलायका आणि अरबाजचा हा व्हिडिओ त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. यामध्ये दिसत आहे की, मुलगा विदेशात परत जात असल्याने मलायका खूपच भावूक होताना दिसून आली. त्यानंतर अरहानने तिला घट्ट मिठी मारली. त्यावेळी मलायका मुलाला काहीतरी समजावताना दिसून आली. तर अरहानही तिचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत असल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे.
त्यानंतर अरहानने वडिलांनाही मिठी मारली आणि तिथे उपस्थित त्याच्या मित्रांशी बोलताना दिसून आला. तर दुसरीकडे मलायका आणि अरबाज दोघे एकमेकांशी बोलताना दिसून आले. हा व्हिडिओ पाहून काही नेटकऱ्यांनी कमेंट करत मलायका आणि अरबाजच्या पालकत्वाबद्दल त्यांचे कौतुक केले. तर काही लोक मात्र ते दोघे भांडत असल्याचा अंदाज लावला.
या व्हिडिओवर कमेंट करताना एकाने लिहिले की, ‘अर्जून आला नाही का?’ दुसऱ्या एकाने लिहिले की, ‘मलायका अरबाजसोबत भांडण करत आहे का?’ दुसऱ्या एकाने लिहिले की, ‘जर तिथे मीडिया नसती तर जोरदार भांडण झाले असते’.
मलायकाने २०१७ साली पती अरबाज खानला घटस्फोट दिला होता. अरबाज आणि मलायका ५ वर्ष एकमेकांना डेट केले होते. त्यानंतर या दोघांनी लग्न केला. पण लग्नाच्या १९ वर्षानंतर मलायका आणि अरबाजने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पण दोघेही मुलगा अरहानसाठी नेहमी एकत्र येताना दिसून आले.
अरबाजसोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका अर्जून कपूरला डेट करू लागली. दोघे नेहमी अनेक कार्यक्रम आणि पार्ट्यांमध्ये एकत्र दिसले आहेत. मलायका अर्जूनपेक्षा १२ वर्षांनी मोठी आहे. त्यामुळे या दोघांच्या नात्यावरून तिला अनेकवेळा ट्रोल करण्यात आले. मात्र, मलायकाने या सर्वांकडे दुर्लक्ष केले.
महत्त्वाच्या बातम्या :
लतादीदींचा शेवटचा व्हिडीओ होतोय व्हायरल, त्यांची अवस्था पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा
14 कोटी फॉलोअर्स असणाऱ्या लता मंगेशकर केवळ ‘या’ नऊ जणांना करत होत्या फॉलो
अभिनेता शाहरुख खान अंत्यदर्शनावेळी लता मंगेशकर यांच्यावर थुकला? काय आहे नेमकं सत्य जाणून घ्या…