Share

भारतात नफा कमवता आणि पाठींबा पाकीस्तानला देता हे चालनार नाही; ह्यूडांई विरोधात भारत एकवटला

कार निर्माती कंपनी ह्यूडांई अचानकपणे सोशल मीडियावर  चर्चेत आली. सध्या ट्विटरवर #BoycotHyundai ट्रेंड करु लागला, याचं कारण आहे की, सोशल मीडियावर ह्यूडांई  पाकिस्तानचं समर्थन करत आहे आणि भारताचा विरोध. यावर आता शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यादेखील आक्रमक होताना दिसत आहेत.

नुकेतच, Hyundai Pakistan च्या ट्विटर हँडलवरुन एक पोस्ट टाकण्यात आली, ज्यात लिहिण्यात आले होते की, काश्मिरी बांधवांच्या बलिदानाचे स्मरण करूया आणि त्यांना पाठिंबा देऊया जेणेकरून ते स्वातंत्र्यासाठी लढत राहतील. ह्या बरोबर #HyundaiPakistan आणि #KashmirSolidarityDay हॅशटॅगही टाकण्यात आला होता.

Hyundai Pakistan च्या ट्विटर हँडलवरुन ट्विट करण्यात आलेले ट्विट प्रचंड व्हायरल झाले. त्यानंतर अनेकांनी कंपनीवर संताप व्यक्त केला. काहींनी कंपनीची वाहने खरेदी करू नाही, असे म्हणत राग व्यक्त केला. तर काहींच्या मते, भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेला समजण्यात कंपनीने चूक केली असून,आता भारतीय या कंपनीला लवकरच गुडघ्यावर आणतील.

एवढ्या मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना,ह्यूडांईनं ट्विटर हँडलवरून ही पोस्ट डिलीट केली, मात्र तोपर्यंत  पोस्टचा स्क्रीन शॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला. कंपनीवर बहिष्कार टाकण्याची चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली, म्हणून कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक निवेदन जारी केले.

या निवेदनात ह्यूडांईनं स्पष्टीकरण दिले मात्र, माफी मागितली नाही. त्यामुळे अनेकजण कंपनीच्या निवेदनावर खुश नाहीत. खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी देखील काल ह्यूडांई कार कंपनीवर सडकून टीका केली. सोमवारी संसदेच्या अधिवेशनात उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली.

https://twitter.com/Pratham_611/status/1490297789934600192?t=ogIDwUS3c4cKHhtHs0qm9A&s=19

त्या म्हणाल्या की, कंपनीने जे निवेदन पत्र दिले त्यात माफी मागितली नाही. कंपनी भारतात व्यवसाय करते, भारतीयांकडून नफा कमावते आणि उलट भारतीयांच्याच विरोधात बोलते. काश्मीरच्या मुद्यावर पाकिस्तानच्या पाठीशी उभे राहिली तर, हे आम्हांला अजिबात मान्य नाही. कंपनीने संपूर्ण देशाची बिनशर्त माफी मागितली पाहिजे.

दरम्यान, कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक निवेदन जारी केले होते त्यात म्हंटले होते की, ‘ह्यूडांई मोटर इंडिया 25 वर्षांहून अधिक काळ भारतीय बाजारपेठेसाठी वचनबद्ध आहे आणि आम्ही भारतीय राष्ट्रवादाच्या संदर्भात ठामपणे उभे आहोत. भारत हे Hyundai ब्रँडचे दुसरे घर आहे आणि आमच्याकडे असंवेदनशील संवादाबाबत शून्य सहनशीलता धोरण आहे. आम्ही अशा कोणत्याही विचारांचा तीव्र निषेध करतो. भारताप्रती असलेल्या आमच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून आम्ही देशाच्या तसेच नागरिकांच्या भल्यासाठी आमचे प्रयत्न सुरू ठेवू.

इतर

Join WhatsApp

Join Now