Share

‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट करमुक्त करा; आमदार नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

uddhav thackeray and nitesh rane

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पेन ड्राईव्ह बॉम्ब नंतर महाराष्ट्रात राजकारण चांगलंच तापलं आहे. विशेष म्हणजे फडणवीस यांना पोलिसांनी पाठवलेल्या नोटीस नंतर भाजप आक्रमक झाली असून आज राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आली आहेत.

तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते नवाब मिलक (Nawab Malik) यांच्यावरील ईडी (ED) कारवाईनंतर भाजपाने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र तरीदेखील ठाकरे सरकारने मलिक यांचा राजीनामा न घेतल्या भाजपाने आक्रमक पवित्रा घेत सरकरविरोधात आंदोलने केली आहेत.

तसेच यातच आता भाजपाचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून एक आगळी वेगळी मागणी केली आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट करमुक्त करा, अशी मागणी राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.

https://twitter.com/NiteshNRane/status/1502951492307009539?s=20&t=RUrL7A0Uc-_RlBrIUqYeWg

राणे यांनी ट्विट म्हंटले आहे की, मुख्यमंत्र्यांनी हा चित्रपट करमुक्त केल्यास, मुस्लीम दहशतवाद्यांनी जम्मु काश्मीर येथील हिंदु समाजावर अत्याचार केल्याचे खरे चित्रीकरण देशातल्या जनतेला पाहता येईल. हा चित्रपट राज्यातील जनतेला लवकर पाहता यावा यासाठी करमुक्त करावा ही विनंती, असे आवाहन राणे केलं आहे.

सगळीकडे सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपटाची चर्चा सुरू आहे. 11 मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षक दोघांकडूनही मोठ्या प्रमाणात दाद मिळत आहे. आनंदाची बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या चित्रपटाचे कौतुक केले आहे.

दरम्यान, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, प्रकाश बेलावडी, अनुपम खेर, दर्शन कुमार, भाषा सुंबली, चिन्मय मंडलेकर, पुनीत इस्सर, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वीराज सरनाइक हे कलाकारांनी या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
भगवंत मान यांच्या ‘त्या’ निर्णयाचे पवारांनीही केले स्वागत; राज्य सरकारलाही केले अनुकरन करण्याचे आवाहन
धक्कादायक! दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असलेल्या ८१ जणांना एकाच दिवशी फासावर लटकवलं…
अपक्ष लढले, तिकीटासाठी पक्षाला रामराम; पराभूत झाल्यावर उत्पल म्हणतात मला आमदार व्हायचच नव्हतं
टाटा ग्रुपच्या ‘या’ चार शेअर्समध्ये आहे राकेश झुनझुवालांची हिस्सेदारी, तुम्ही खरेदी केले का?

इतर ताज्या बातम्या मनोरंजन राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now