Share

..म्हणून मी किरण मानेंच्या बाजूने आहे, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेत्रीचा किरण मानेंना जाहीर पाठिंबा

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत विलास पाटील ही भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने यांना नुकतीच मालिकेतून काढण्यात आले आहे. आपण राजकीय भूमिका घेतल्याने आपल्याला मालिकेतून काढल्याचा आरोप किरण माने यांनी केला. त्यानंतर या प्रकरणावर अनेक कलाकारांसोबत नेतेमंडळींनीही प्रतिक्रिया देत याचा निषेध केला. यादरम्यान आता ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील अभिनेत्री अनिता दाते यांनीही एक पोस्ट शेअर करत किरण मानेंना त्यांचा पाठिंबा जाहिर केला आहे.

अनिता दाते यांनी त्यांच्या फेसबुकवर पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘एक अभिनेत्री म्हणून मी किरण माने ह्यांच्या बाजूने आहे. कोणत्याही अभिनेत्याला/अभिनेत्रीला आगाऊ कल्पना न देता अथवा कोणतीही समज न देता अथवा कोणतेही कारण न देता कामावरून बाजूला करणे हे चुकीचे आहे. अश्या निर्मिती संस्था आणि चॅनल ह्यांनी त्या कलाकाराला कामावरून काढण्याचे योग्य कारण देण्याचे सौजन्य दाखवले पाहिजे. अश्या व्यवस्थांचा मी निषेध करते’.

‘व्यवस्था समजून घेणे, व्यवस्थेला प्रश्न विचारणे, आपली राजकीय भूमिका योग्य पद्धतीने मांडता येणे ही खरंतर चांगली गोष्ट आहे, असंच मी मानते. त्याबाबत किरण माने ह्याचे कौतुक आहे. एखादया व्यक्तीची पोस्ट समजून घेण्याऐवजी त्याची गळचेपी करणे हे चुकीचे आहे’.

‘आपली राजकीय भूमिका वेगळी असेल तर आपण त्या व्यक्तीशी वाद घालू शकतो, चर्चा करू शकतो. मात्र, त्याचं तोंड बंद करणे, त्याला धमकावणे, त्याच्या व्यवसायावर, कामावर टाच आणणे हे समाज म्हणून आपण निर्बुद्ध व मागास असल्याचे लक्षण आहे’.

दरम्यान, किरण माने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत केंद्र सरकारवर टीका केली होती. त्यानंतर त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता तडकाफडकी काढून टाकण्यात आले. तर ही सांस्कृतिक दडपशाही असून हे राजकीय हस्तक्षेपातून घडल्याचा आरोप माने यांनी केला.

तर दुसरीकडे किरण माने यांना प्रोफेशनल कारणांमुळे मालिकेतून रिप्लेस करण्यात आल्याचे निर्मात्यांद्वारे सांगण्यात आले. तसेच ही प्रोफेशनल कारणे काय होती हे माने यांना माहित होते. याबाबत माने यांना त्याची अनेकदा माहिती दिली गेली होती. अनेकदा सांगूनही त्या कारणांवर तोडगा निघाला नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला, असेही निर्मांत्याद्वारे सांगण्यात आले.

किरण माने यांना मालिकेतून काढून टाकल्यानंतर त्याचा पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटला. सोशल मीडियावर अनेक लोकांनी या घटनेचा निषेध करत किरण मानेंना त्यांचा पाठिंबा जाहिर केला. यासोबत अनेक कलाकार आणि नेतेमंडळींनीही किरण माने यांच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर करत त्यांना पाठिंबा दर्शवला.

महत्त्वाच्या बातम्या : 

अशा प्रवृत्तींना आमच्या गावात प्रवेश नाही; ग्रामपंचायतीनं बंद पाडलं ‘मुलगी झाली हो’चं शुटींग
किरण मानेंनी महीला कलाकारांशी गैरवर्तन केल्यामुळे त्यांना मालिकेतून काढले; स्टार प्रवाहने दिले स्पष्टीकरण

लग्न होऊनही आपल्या पतीपासून २७ वर्षे लांब राहिल्या होत्या अलका याज्ञिक, कारण वाचून अवाक व्हाल

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now