Share

LPG: LPG च्या नियमांत मोठा बदल; वर्षभरात मिळणाऱ्या सिलेंडरच्या संख्येत घट, ग्राहकांची उडणार तारांबळ

घरगुती एलपीजी ग्राहकांसाठी आता एक महत्वाची बातमी समोर आली आहे. यापुढे घरगुती एलपीजी ग्राहकांना सिलेंडर जपून वापरावा लागणार आहे. कारण आता सिलेंडर वर्षभरात किती वापरावेत याला मर्यादा आली आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी ही नक्कीच दुःखाची बातमी आहे.

नव्या नियमांनुसार एका घरगुती एलपीजी कनेक्शनवर वर्षभरात आता केवळ १५ सिलेंडर मिळणार आहेत. घरगुती एलपीजी ग्राहकांना १५ पेक्षा जास्त सिलेंडर मिळणार नाहीत. त्याचबरोबर एका महिन्याचा कोटाही आता निश्चित करण्यात आला आहे.

आता कोणत्याही ग्राहकाला एका महिन्यात दोनपेक्षा जास्त सिलेंडर घेता येणार नाहीत. आत्तापर्यंत घरगुती विनाअनुदानित कनेक्शन असलेल्या ग्राहकांना हवा तेव्हा आणि वर्षभरात लागतील तेवढे सिलेंडर मिळत होते. पण आता नव्या नियमांनुसार, घरगुती एलपीजी ग्राहकांना वर्षभरात केवळ १५ सिलेंडरच मिळणार आहेत.

माहितीनुसार, अनुदानित घरगुती गॅस सिलेंडरसाठी नोंदणी केलेल्यांना या दराने वर्षभरात फक्त १२ सिलेंडर मिळणार आहेत. तर यापेक्षा जास्त सिलेंडरची गरज असल्यास ग्राहकांना अनुदान नसलेले सिलेंडर घ्यावे लागेल. तर, नवीन नियमांनुसार, रेशनिंग अंतर्गत असलेल्या एका कनेक्शनवर एका महिन्यात फक्त दोनच सिलेंडर मिळणार आहेत.

वितरकांनी दिलेल्या माहितनुसार, सिलिंडरसंदर्भात रेशनिंगसाठी असणाऱ्या सॉफ्टवेअरमध्ये बदल केले आहेत. या बदलांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. अनुदानित घरगुती गॅसचे रीफिल हे व्यावसायिक गॅस सिलिंडरपेक्षा महाग आहे.

त्यामुळे व्यावसायिक वापरासाठी अनुदानित घरगुती गॅस रिफीलचा वापर कऱण्यात येतो. याच्या तक्रारी समोर आल्यानं घरगुती एलपीजी सिलिंडरच्या संख्येवर मर्यादा आणण्याचा निर्णय घेतला गेला. नवा नियम लागू करण्यात आला असून तीनही तेल कंपन्यांकडून आता मर्यादीत संख्येनुसार सिलिंडर दिले जातील.

इतर आर्थिक

Join WhatsApp

Join Now