‘मैंने प्यार किया’ फेम अभिनेत्री भाग्यश्रीची मुलगी अवंतिका दासानी (bhagyashree daughter avantika dasani) लवकरच मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करणार आहे. अवंतिका रोहन सिप्पी यांच्या ‘मिथ्या’ या सायकोलॉजिकल थ्रिलर ड्रामा वेबसीरिजद्वारे तिच्या अभिनय क्षेत्रातील करिअरची सुरुवात करणार आहे. अवंतिकाने स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.
अवंतिकाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर ही पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने तिच्या मिथ्या वेबसीरीजचा पोस्टर शेअर केला आहे. यामध्ये अवंतिका इंटेंस लूकमध्ये पोझ देताना दिसून येत आहे. पोस्टर शेअर करत तिने लिहिले की, ‘गोष्टी नेहमी तसे नसतात जसे ते दिसतात. तेव्हा खोटेपणाच्या या जाळ्यासाठी प्रत्यक्षात कोण जबाबदार आहे. मिथ्या लवकरच येत आहे ZEE5 वर’.
तिने पुढे लिहिले की, ‘माझ्या या पहिल्यावहिल्या वेबसीरीजची घोषणा करताना मी खूपच विनम्र, आभारी आणि उत्साहित आहे’. मिथ्या ही सीरीज २०१९ साली आलेल्या चीट या ब्रिटीश सीरीजचे रिमेक आहे. रोहन सिप्पीद्वारे दिग्दर्शित या सीरीजची निर्मिती अप्लॉज एंटरटेनमेंटद्वारे करण्यात येत आहे. यामध्ये एकूण ६ एपिसोड्स आहेत.
यामध्ये अवंतिकासोबत अभिनेत्री हुमा कुरेशी, रजित कपूर आणि समीर सोनी मुख्य भूमिकेत आहेत. हुमा कुरेशी या सीरीजमध्ये एका प्राध्यापिकेच्या भूमिकेत तर अवंतिका तिच्या विद्यार्थीनीच्या भूमिकेत आहे. चित्रपटाचे कथानक या दोन भूमिकांच्या अवतीभोवती फिरते.
दरम्यान, भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यु दासानीने यापूर्वीच सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. त्याने २०१८ साली आलेल्या ‘मर्द को दर्द नही होता’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर आता भाग्यश्रीची मुलगी अवंतिका सिनेसृष्टीत आपले नशीब आजमावण्यास तयार आहे. तर तिच्या पहिल्या सीरीजद्वारे अवंतिका प्रेक्षकांवर तिच्या अभिनयाचा जादू करेल का? हे पाहणे औत्सुक्याचे असेल.
दरम्यान, अभिनेत्री भाग्यश्री आता चित्रपटांत जास्त सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर ती नेहमीच सक्रिय असते. याद्वारे ती नेहमी तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांशी शेअर करत असते. तिच्या या फोटोंना चाहत्यांकडूनही खूप पसंती मिळत असते.
महत्त्वाच्या बातम्या :
श्वेता तिवारीचे वादग्रस्त वक्तव्य; अंडरगारमेंटला देवाशी जोडले, म्हणाली, ‘देव माझ्या ब्रा ची…’
..त्यामुळे अभिनय सोडून बॉबी देओलला करावे लागले नाईट क्लबमध्ये काम, कठीण काळात पत्नीने दिली साथ
‘तू खरंच खुप चांगला आहेस, माझं तुझ्यावर निस्वार्थी प्रेम आहे’; श्रेयसला संकर्षणने दिल्या खास शुभेच्छा