ज्येष्ठ विचारवंत आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्राध्यापक एन. डी. पाटील यांचे आज निधन झालं आहे. ते ९३ वर्षांचे होते. ब्रेन स्ट्रोक आल्यामुळे त्यांना चार दिवसांपूर्वी कोल्हापूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कालपासून त्यांची प्रकृती गंभीर होती. आज दुपारी १२ वाजता उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गेल्या वर्षी प्राध्यापक एन. डी. पाटील यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र वयाच्या ९२ व्या वर्षीही त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती. पण यावेळी त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनामुळे सर्वसामान्यांचा आधारवड हरपला, अशी भावना सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे. प्राध्यापक एन. डी. पाटील यांनी सातत्याने सरकारपुढे कामगार आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले होते.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होत होता. या आजारांवर उपचार सुरु होते. काही दिवसांपासून त्यांना बोलण्यात अडथळा जाणवत होता. तेव्हा त्यांच्या विविध चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत होती. आज सकाळी त्यांची शुद्ध हरपली आणि रक्तदाब कमी झाला होता.दुपारी १२ वाजता त्यांचे निधन झाले.
१५ जुलै १९२९ रोजी सांगली जिल्ह्यातील ढवळी गावात प्राध्यापक एन. डी. पाटील यांचा जन्म झाला होता. एन. डी. पाटील यांचे वडील एक सामान्य शेतकरी होते. त्यांना लहानपणापासून शिक्षणाची आवड होती. त्यांनी पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि वकिलीचे शिक्षण घेतले आहे. यानंतर एन. डी. पाटील रयत शिक्षण संस्थेत प्राध्यापक म्हणून रुजू झाले.
१९४८ मध्ये त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. यानंतर १९५७ ला त्यांची मुंबई गिरणी कामगार संघटनेच्या सरचिटणीसपदी निवड झाली. १९६० ते १९८२ या कालावधीत ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. काही काळ त्यांनी महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री पद देखील भूषविले. १९८५ ते १९९० या काळात ते कोल्हापूर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते.
प्राध्यापक एन. डी. पाटील यांना शिवाजी विद्यापीठ व मराठवाडा विद्यापीठाकडून डी. लीट पदवी प्रदान करण्यात आली होती. १९९४ मध्ये त्यांचा माधव बागल पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. त्यांनी काही पुस्तकांचे लेखन देखील केले होते. समाजविकास योजनेचे वस्त्रहरण आणि महाराष्ट्र सरकारचा प्रतिगामी कायदा हे त्यांचे प्रसिद्ध झालेले लेखन आहे.
महत्वाच्या बातम्या :-
VIDEO: बोल्ड व्हिडिओमुळे नुसरत जहाँ झाली ट्रोल; लोक म्हणाले, खासदार आहे थोडी तरी लाज ठेव
पती की राक्षस! अनैसर्गिक सेक्स, सिगारेटचे चटके, न्यूड डान्स, मग मित्रांकडून केला सामूहिक बलात्कार…
नशीबच बदललं! एका वर्षात 2000% छप्परफाड रिटर्न; गुंतवणूकदारांना मिळाली आयुष्यभराची कमाई