मुंबई, 4 एप्रिल : मनसेच्या गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे यांनी माहीमच्या समुद्रात अनधिकृत मंदिराचे बांधकाम आणि त्याला भेट देणारे काही लोक दाखवणारा व्हिडिओ दाखवला. हे मंदिर हटवले नाही तर त्याच्या शेजारी गणपतीचे मंदिर बांधू, असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता.
राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि 24 तासात माहीमची सागरी कबर हटवण्यात आली. मात्र आता दर्गा असलेल्या भागाचा व्हिडिओ समोर आला आहे. या भागात अजूनही नागरिकांचे जाणे येणे सुरू असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ समोर आल्यानंतर मनसेकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. राज ठाकरेंनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर 24 तासांत सरकारने कारवाई केली आहे. माहीम पोलीस व प्रशासनाने तिकडे लक्ष देण्याची गरज आहे. तेथे कोणतेही अनधिकृत बांधकाम होता कामा नये, हे त्यांनी लक्षात ठेवावे.
अन्यथा महाराष्ट्राचे सैनिक सज्ज आहेत. यंत्रणेने जागे व्हावे, झोपेचा बहाणा चालणार नाही. राज ठाकरेंच्या सूचनेनुसार सरकारने कारवाई केली मात्र त्यानंतरही या गोष्टी सुरू राहिल्यास पुन्हा यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी केली आहे.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते? माहीमच्या मगदुन बाबांसमोर अनधिकृत मझार बांधली जात आहे. ती दोन वर्षांत पूर्ण झाली आहे, लोकांचे लक्ष नाही. महापालिकेतील लोकांनाही हे होतान दिसले नाही. भर दिवसा मुंबईच्या समुद्रात नवीन हाजी अली निर्माण होत आहेत.
आता आज मी प्रशासन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्तांना सांगतो की, महिनाभरात कारवाई न झाल्यास, ते पाडले नाही, तर त्याच्या शेजारी सर्वात मोठे गणेश मंदिर उभारले जाईल. त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तर आमच्याकडे दुर्लक्ष करा, असे राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळ्यात सांगितले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे झालेल्या पाडव्याच्या मेळ्यात माहीम दर्ग्याच्या आजूबाजूच्या समुद्रात बेकायदा बांधकामांचा आरोप केला होता. राज ठाकरेंच्या या आरोपाची प्रशासनाने दखल घेतली होती. माहीम समुद्रकिनारी पोलिसांच्या बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली होती.
माहीम दर्गा परिसरात सुरू असलेले हे अवैध बांधकाम अखेर पाडण्यात आले आहे. राज ठाकरेंच्या आरोपानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार हे बांधकाम अखेर पाडण्यात आले आहे.
माहीम दर्गा परिसरात समुद्रात बेकायदा बांधकामे झाली असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. हे बांधकाम हटविण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. राज ठाकरेंच्या आरोपाची प्रशासनाने दखल घेतली आहे. तिथे कारवाई करण्यात आली आहे.
राज ठाकरेंच्या आरोपानंतर माहीम समुद्रकिनारी पोलिस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. राज ठाकरेंच्या आरोपानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार हे बांधकाम अखेर पाडण्यात आले होते.
या भागात बेकायदा बांधकामे झाल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. राज ठाकरेंच्या आरोपानंतर प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेतली. अधिकाऱ्यांनी प्रथम परिसराची पाहणी केली त्यानंतर अतिक्रमण हटवण्यात आले आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण तोडण्यात आले.






