Share

Mumbai: बिल्डींगमध्ये राहणारी ती महीला शेजाऱ्यांना पाठवायची पाॅर्न व्हिडीओ; सत्य समजल्यावर सगळेच हादरले

facebook porn

मुंबई(Mumbai): बोरिवलीतील एक तरुणाने फेसबुकच्या माध्यमातून सेक्सटॉर्शन रॅकेट चालवण्याचा अपराध केला आहे. तरुणाचे वय २९ वर्ष आहे. फेसबुकवर महिलेच्या नावानं फेसबुक अकाऊंट उघडून हा तरुण अनेकांशी रोमँटिक संवाद साधायचा. केलेल्या संवादाचे स्क्रीनशॉट काढून समोरील व्यक्तींना ब्लॅकमेल करून त्यांना पैशाची मागणी करायचा.

याबद्दल तक्रार मिळाल्यानंतर कस्तुरबा मार्ग पोलिसांनी २९ वर्षांच्या तरुणाला ताब्यात घेऊन अटक केली. मे महिन्यामध्ये तक्रारदाराला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली. तक्रारदार व्यक्ती ५२ वर्षाचा आहे. प्रोफाईल फोटो ओळखीचा वाटल्याने तक्रारदारानं रिक्वेस्ट स्वीकारली. पुढील काही दिवसांत दोघांमध्ये फेसबुकवर बोलणं सुरू झालं. तक्रारदाराला रोमँटिक मेसेज येऊ लागले.

थोड्याच दिवसात अश्लील आणि पॉर्न कंटेटही येऊ लागला. तक्रारदार फेसबुकवर महिला समजून त्या २९ वर्षीय तरुणाशी बोलत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. तक्रादार व्यक्तीशी काही दिवस बोलल्यानंतर तरुणाने संवादाचे स्क्रीनशॉट घेतले आणि ब्लॅकमेलिंग सुरू केलं. पैसे दे, अन्यथा स्क्रीनशॉट इमारतीमधील लोकांना पाठवून तुझी बदनामी करेन, अशी धमकी तक्रारदाराला तरुणाने दिली.

धमकी मिळताच तक्रारदार घाबरला. त्याने आरोपीला १० हजार रुपये रक्कम दिली. मात्र तरुणाकडून होत असलेली मागणी वाढतच गेली. तरुणाने आणखी काही लोकांनासुद्धा असेच ब्लॅकमेल केले. झोन १२ चे पोलीस उपायुक्त सोमनाथ घारगे यांनी सांगितलं की, आरोपी तरुणानं ज्या महिलेच्या नावानं फेक फेसबुक अकाऊंट सुरू केलं होते.

त्या महिलेला याबद्दल थोडीही कल्पना नव्हती. ब्लॅकमेलिंगचे प्रकार वाढल्यावर सोसायटीमधील काहींनी महिलेला हा विषय सांगितला. महिलेचा फोटो आणि तिची माहिती यांचा गैरवापर झाल्याचं तिला कळताच, महिला आणि तक्रारदारानं ३० जुलैला तक्रार नोंदवली. या गुन्ह्यासंदर्भात तरुणाला अटक करण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. आरोपी तक्रारदाराला पैशांसाठी ब्लॅकमेल करत होता.

तक्रारदारानं पैसे देत आहे असे सांगून तरुणाला पैसे ठेवण्याची जागा विचारली. इमारतीमध्ये उभ्या असलेल्या एका कारच्या चाकाजवळ पैसे ठेव, असं आरोपीनं तक्रारदाराला सांगितलं. त्यानंतर तक्रारदारानं एक लिफाफा कारच्या चाकाजवळ ठेवला. तो घेण्यासाठी आरोपी तेथे आला व पोलिसांनी त्याला अटक केली.

महत्वाच्या बातम्या
आम्ही अजूनही राजसाहेबांसोबत, आम्हाला फसवून शिंदे गटात नेलं होतं; मनसे नेत्यांनी सांगितली खरी कहाणी
आमदार अनिल बाबर यांच्या पत्नीचे निधन; कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली होती भेट
सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरेंच्या वकीलांचा खणखणीत युक्तिवाद; शिंदे गटाचे टेन्शन वाढले 
गणेशोत्सवात शेवटच्या ५ दिवसांत रात्री १२ पर्यंत साऊंड सिस्टीम वाजवता येणार; मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा

क्राईम इतर ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now