Share

Shinde group : शिंदेगटात गेलेल्या महीला आमदाराची आमदारकीच रद्द होणार; केला ‘हा’ मोठा गुन्हा

नुकत्याच शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या आमदार लता सोनावणे यांच्या अडचणीत वाढ झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. लता सोनावणे यांना आमदार म्हणून अपात्र ठरवा, अशी याचिका आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे करण्यात आली आहे.

जात वैधता प्रमाणपत्रावरुन लता सोनावणे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आदिवासी संघटनांच्या ५२२ पदाधिकाऱ्यांनी मिळून राज्यपालांकडे लता सोनावणे यांच्याविरोधात याचिका दिली आहे. खोटं जात वैधता प्रमाणपत्राप्रकरणी लता सोनावणे यांच्या अपात्रकेची कारवाई केली जावी, अशी आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची मागणी आहे.

यावर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या याचिकेबाबत काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे. २०१९ ची निवडणूक लढवताना लता सोनावणे यांनी टोकरी कोळी हे अनुसूचित जातीचं जातप्रमाणपत्र सादर केलं होतं. मात्र हे प्रमाणपत्र नंदुरबार जात पडताळणी समितीने अवैध ठरवलं होतं.

त्यानंतर, ९ फेब्रुवारी २०२२ ला हे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आदिवासी समाजाकडून करण्यात आली आहे. लता सोनावणे यांच्याबद्दल अधिक माहिती म्हणजे, लताबाई चंद्रकांत सोनावणे ह्या जळगाव जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या चोपडा विधानसभा मतदारसंघातनू शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आल्या आहेत.

सध्या त्या शिंदे गटाच्या आमदार आहेत. १३ वी विधानसभा निवडणूक जिंकून येणाऱ्या माजी आमदार चंद्रकांत बळीराम सोनावणे यांच्या त्या पत्नी आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर त्यांच्यासोबतच्या ४० आमदारांमध्ये जळगाव जिल्ह्यातील पाच आमदारांचा समावेश होता आणि त्यात सोनवणे या एक होत्या.

आमदार सोनावणे यांनी २०१९ ची सार्वत्रिक निवडणूक लढवताना खोटे जात वैधता प्रमाणपत्र दाखल केले होते. दरम्यान, आमदार सोनावणे यांचे “टोकरे कोळी” अनुसूचित जमातीचे जात वधता प्रमाणपत्र, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, नंदुरबार जिल्हा यांनी ९ फेब्रुवारी, २०२२ रोजी अवैध ठरवले होते.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now