Share

mahesh tilekar : स्वप्नील जोशी आणि पोंक्षेंना हिंदु धर्मासाठी दिलेल्या योगदानाबद्दल मिळाला पुरस्कार, तर भडकला दिग्दर्शक म्हणाला…

swapnil joshi sharad ponkshe

mahesh tilekar angry on swapnil joshi and sharad ponkshe  | गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडच्या चित्रपटातील वेगवेगळ्या गोष्टींवरुन वाद निर्माण केले जात आहे. त्यांना बॉयकॉट केले जात आहे. आमिर खानच्या लालसिंग चड्ढा नंतर आता शाहरुख खानच्या पठाणला बॉयकॉट करण्याची मागणी केली जात आहे.

पठाणच्या बेशरम गाण्यात दीपिका पादूकोणने भगव्या रंगाची बिकीनी घातली आहे. त्यामुळे या चित्रपटाला बॉयकॉट केले जात आहे. अशात अनेक नेते, अभिनेते, दिग्दर्शक यावर प्रतिक्रिया देत आहे. आता प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

महेश टिळेकर अनेकदा समाजातील घडणाऱ्या गोष्टींवर भाष्य करताना दिसत असतात. ते अनेकदा आपले मत स्पष्टपणे मांडत असतात. त्यामुळे ते चर्चेतही येतात. आता पुन्हा एकदा त्यांचे वक्तव्य चर्चेत आले आहे. दुसऱ्या धर्माचे असूनही आमिर आणि शाहरुख खान मंदिरात जातात, देवाची पूजा करतात असे महेश टिळेकर यांनी म्हटले आहे. त्यांनी एक फेसबूक पोस्ट केली आहे

हिंदू नसूनही लोक समाज काय म्हणेल याची पर्वा न करता आमिर खान हिंदू पद्धतीने स्वत:च्या ऑफिसमध्ये पूजाविधी करताना दिसतो. तर शाहरुख खान वैष्णोदेवीच्या मंदिरात जाताना दिसतो. या कलाकांरांनी स्वत:च्या प्रोडक्शन हाऊसमध्ये हिंदूना जॉब देऊन नव्या कलाकारांनाही संधी दिली आहे, असे महेश टिळेकर यांनी म्हटले आहे.

शरद पोंक्षे आणि स्वप्नील जोशी यांना हिंदू धर्मासाठी दिलेल्या योगदानाबद्दल पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे महेश टिळेकर यांनी निशाणा साधला आहे. यावेळी शरद पोंक्षे आणि स्वप्नील जोशीवर निशाणा साधताना त्यांनी शाहरुख खान आणि आमिर खानचे समर्थन केले आहे.

अभिनयासाठी किंवा समाजासाठी केलेल्या कार्यासाठी अभिनेत्याला पुरस्कार मिळताना आतापर्यंत बघितलं होतं. पण कलाकाराला धर्मासाठी पुरस्कार देण्यात येतोय हे पहिल्यांदा बघितलं. आता स्वप्नील जोशी आणि शरद पोंक्षे यांनी हिंदुत्वासाठी किती आणि काय काम केलं ते जगासमोर आलं तर त्यांच्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळेल, असे टिळेकर यांनी म्हटले आहे.

तसेच शरद पोंक्षेंना आणि स्वप्नील जोशीला हिंदुत्वासाठी पुरस्कार मिळतो. पण हिंदू नसूनही वैष्णोदेवीसारख्या हिंदू मंदिरात जाणारा शाहरुख खान आणि स्वत:च्या नवीन ऑफिसमध्ये हिंदू पद्धतीने पूजाविधी करणारा आमिर खान यांना कोणती हिंदू संस्था पुरस्कार देईल? असा सवालही महेश टिळेकर यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या-
kl rahul : गिल-पुजाराच्या शतकानंतरही होऊ शकतो भारताचा पराभव, केएल राहूलची ‘ती’ चुक ठरु शकते संघासाठी घातक
Sayrus Mirstri : ‘या’ व्यक्तीच्या घोडचूकीमुळेच सायरस मिस्रींना गमवावा लागला जीव; अखेर नाव झाले उघड
gautami patil : राष्ट्रवादीच्या कार्यकर्ताच्या वाढदिवसाला गौतमीची लावणी, स्टेजवर अचानक सुरु झाला राडा अन्…

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now