Mahesh shinde warning to NCP | विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सध्या जोरात सुरुआहे. रामराजे हे सातारा जिल्हातील फलटणच्या राजघराण्याचे २९ वे वंशज आहे. नुकतीच विधानपरिषदेची निवडणूक जिंकून ते सभापतिपदी विराजमान झाले आहे. रामराजेंचे जावई राहुल नार्वेकर सुद्धा भाजपचे आमदार आहे, त्यामुळे चर्चेला उधाण आलेले आहे की जावया बरोबरच सासरेसुद्धा भाजपमध्ये जाणार का?
कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, ‘राष्ट्रवादीचं खळं उठलंय, वस्ती उठायला वेळ लागणार नाही, आता बोजा बिस्तारा गुंडाळायला जास्त वेळ लागणार नाही. असा टोला लगावत ते पुढे म्हणाले की, आमच्याकडे रांग लागली आहे, त्यामुळे सब कतार में हैं.
पुढे ते म्हणाले की, योग्य टायमिंग आल्यावर मुख्यमंत्री शिंदे कार्यक्रम करतात. ज्यांना दादागिरीपासून मुक्तता पाहिजे, खरोखर महाराष्ट्राचा विकास करायचा आहे, अश्या सगळ्यांना मुख्यमंत्री सोबत घेऊन चालतील. शिंदे व फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून पुन्हा ऑपरेशन लोटस सुरु केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
अशातच रामराजे निंबाळकर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण आलेले आहे. बंडखोर आमदारांपैकी महेश शिंदे यांनी रामराजेंच्या भाजप प्रवेशाच्या बाबतीत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले. महेश शिंदे म्हणाले की, निंबाळकर यांना भाजपमध्ये घेण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात येईल. याबाबत आम्ही छोटे नेते काहीही निर्णय घेऊ शकत नाही.
विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर म्हणजे रामराजे यांचे जावई व सभापतिपदी सासरे अशी जोडी पाहायला मिळणार आहे त्यामुळे जावई व सासरे सोबतच भाजपमध्ये असणार का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले होते.
त्यावेळी तेथे जालन्याचे शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी शिंदेंची भेट घेतली. तसेच सोलापूर जिल्हातील माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबन शिंदे आणि माजी आमदार राजन पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे हे दोन राष्ट्रवादीचे नेते भाजपमध्ये येणार का याकडे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
आली रे आली आता भाजपची बारी आली! आता भाजपचेच तब्बल १६ आमदार फुटणार
शिवसेना कुणाची? शिंदे – ठाकरे वादात सर्वोच्च न्यायालयाचा उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा; दिली ‘ही’ परवानगी