Share

mahesh shinde : शिंदे गटात महत्वाची भूमिका बजावणारे ‘हे’ दोन बडे आमदार नाराज, शिंदे गट फुटणार?

Eknath Shinde

mahesh shinde on shambhuraj desai  | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपसोबत हात मिळवणी करत राज्यात सरकार स्थापन केले होते. सरकार स्थापन होऊन १०० दिवस झाल्यामुळे त्यांनी आपल्या आमदारांना गुवाहटीला नेले होते. तिकडे त्यांनी कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते.

आपण सत्तेतून आता हटणार नाही, असे नारे आमदार देताना दिसून येत होते. पण आता पुन्हा एकदा आमदारांच्या नाराजीची चर्चा रंगली आहे. कोरेगावचे आमदार महेश शिंदे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्यावर नाराज असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या महिन्याभरापासून साताऱ्यात याची चर्चा होत आहे.

महेश शिंदे हव्या त्या पद्धतीने काम करु देत नसल्यामुळे ते शंभुराज देसाई यांच्यावर नाराज आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या साऱ्यातच आता फुट पडणार की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शंभूराज देसाई आणि महेश शिंदे या दोघांनीही शिंदे गटात महत्वाची भूमिका निभावली आहे.

अशात गेल्या काही दिवसांपासून दोन्ही नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. पण याबाबत त्यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली असता त्यांनी असे काही नसल्याचे सांगितले आहे. शंभूराज देसाई यांच्यावर आपली कुठलीही नाराजी नसल्याचे महेश शिंदे यांनी सांगितले आहे.

शंभूराज देसाई यांच्यावर आपली कोणतीही नाराजी नाही. अपेक्षा तर प्रत्येकालाच असते. ज्याचं नशीब असतं. त्यालाचं ते मिळतं. मी माझं काम करत राहतोय. याचा रिझल्ट मला १०० टक्के मिळणार. याची मला खात्री आहे, असे महेश शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे.

महेश शिंदे हे आक्रमक नेते म्हणून प्रसिद्ध आहे. पण साताऱ्यामध्ये ते काम करताना पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा पाठींबा त्यांना मिळत नसल्याची चर्चा आहे. तसेच महेश शिंदे यांची ही नाराजी जास्त काळ टिकली तर शिंदे गटात फुटही पडू शकते, असेही म्हटले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-
आली समीप घटीका! राणादा-पाठकबाई ‘या’ दिवशी करणार लग्न; दोघांच्याही घरी लग्नविधी झाले सुरु
एकाच षटकात ७ सिक्स ठोकणाऱ्या ऋतुराजने जिंकली मने; ‘या’ खेळाडूला दिला स्वताचा सामनावीर पुरस्कार
Sanju Samson : टिम इंडीयात स्थान न मिळालेल्या संजू सॅमसनचा फिफा वर्ल्डकपमध्ये जलवा; वाचा कतारमध्ये नेमकं काय घडलं…

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now