Share

‘महाराष्ट्र दिनी’ महेश मांजरेकर करणार महाघोषणा; म्हणाले, ‘तुमचं लक्ष असुद्या, प्रतिक्रिया अत्यंत मोलाची’

mahesh manjrekar

महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. आतापर्यंत मराठीतील अनेक लोकप्रिय आणि दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन महेश यांनी केलं आहे. मराठीसोबत हिंदीतही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. तर आता लवकरच महेश मांजरेकर प्रेक्षकांसाठी एक नवीन कलाकृती घेऊन येणार आहेत.

महेश यांनी यासंदर्भात सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे. तसेच उद्या १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ते यासंदर्भात घोषणा करणार असल्याचे म्हटले आहे. महेश यांनी त्यांच्या फेसबुक हँडलवर ही पोस्ट शेअर केली. यामध्ये त्यांनी एक पोस्टर शेअर केला असून त्यावर लिहिलेले दिसत आहे की, ‘१ मे महाराष्ट्र दिनी महाघोषणा. सकाळी १० वाजता’.

यासोबत त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, ‘उद्या १ मे.. महाराष्ट्र दिन. आपल्या महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस. या दिवशी नव्या कलाकृतीची घोषणा करायची तर ती महाघोषणाच असायला हवी. खात्री देतो, तशी ती असेलच. उद्या सकाळी दहा वाजता. तुमचं लक्ष असू द्या कारण, तुमची प्रतिक्रिया अत्यंत मोलाची’.

https://www.facebook.com/maheshmanjrekaronline/posts/558902105597255

महेश यांनी १९९२ साली आलेल्या ‘जीवा सखा’ या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी ‘फक्त लढ म्हणा’, ‘जय जय महाराष्ट्र माझा’, ‘वृंदावन’, ‘एफ यू – फ्रेंडशीप अनलिमिटेड’, ‘टेक केअर गुड नाईट’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘केसरी’ अशा मराठी चित्रपटात तर ‘जिंदा’, ‘प्लान’, ‘मुसाफिर’, ‘काँटे’, ‘दस कहानियां’, ‘वॉन्टेड’, ‘रेडी’, ‘दबंग’ अशा चित्रपटात काम केले.

एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच ते उत्तम दिग्दर्शकही आहेत. आतापर्यंत त्यांनी मराठीत ‘शिक्षणाच्या आयचा घो’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘काकस्पर्श’, ‘नटसम्राट’, ‘भाई – व्यक्ती की वाली’, ‘नाय वरणभात लोंचा कोन नाय कोंचा’ अशा अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तर हिंदीत त्यांनी ‘वास्तव’, ‘अस्तित्व’, ‘कुरुक्षेत्र’, ‘निदान’, ‘जिस देश में गंगा रहता है’, ‘एहसास द फीलिंग’, ‘हत्यार’, ‘विरूद्ध’, ‘वाह लाईफ हो तो ऐसी’ असे चित्रपट दिले आहेत.

हिंदीत त्यांचा ‘अंतिम – दा फायनल ट्रुथ’ हा चित्रपट शेवटचा प्रदर्शित झाला होता. यामध्ये बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान मुख्य भूमिकेत दिसला होता. परंतु, या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. तर आता ते उद्या कोणत्या चित्रपटाची घोषणा करणार, हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात; गाडीत होते ‘हे’ मराठी अभिनेते
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीवर पडली ईडीची धाड, तब्बल ७.२७ कोटींची मालमत्ता केली जप्त
अजय-सुदीपच्या वादावर प्रसिद्ध निर्मात्याची प्रतिक्रिया, म्हणाला, ‘साऊथ स्टार्सवर जळतात हिंदी स्टार्स’

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now