Share

महेश मांजरेकरांचा ‘स्वातंत्र्यवीर सावकर’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला; बॉलिवूडचा ‘हा’ सुपरस्टार साकारणार भूमिका

बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डा, त्याच्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असतो. व्यक्तिरेखा लहान असो वा मोठी, रणदीप हुड्डा अभिनयाने प्रत्येकाच्या हृदयात आपले स्थान निर्माण करतो. आपल्या उत्कृष्ट अभिनयाने बॉलीवूडमध्ये त्याने वेगळे स्थान निर्माण केले आहे. (mahesh manjrekar new film swatantryaveer sawarkar)

आता रणदीप हुड्डा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण त्याचा आता नवा सिनेमा येत आहे. यावेळी रणदीप हुड्डा एका हटक्या भूमिकेत दिसून येणार आहे. येत्या सिनेमात तो स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर सावरकर उर्फ वीर सावरकर यांची भूमिका साकारणार आहे.

‘सरबजीत’च्या यशानंतर निर्माता संदीप सिंग पुन्हा एकदा रणदीप हुड्डासोबत स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटावर काम सुरू करणार आहेत. निर्माते आनंद पंडित आणि संदीप सिंग यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर या त्यांच्या चित्रपटासाठी रणदीपला भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील हिरो म्हणून कास्ट केले आहे. याची घोषणा निर्मात्यांनी सोशल मीडियावर केली आहे. ज्यासोबत या चित्रपटातील अभिनेत्याचा फर्स्ट लूकही शेअर करण्यात आला आहे.

या चित्रपटाचे शूटिंग या वर्षी जून २०२२ पासून सुरू होणार आहे. लंडन, महाराष्ट्र आणि अंदमान निकोबार बेटांवर ठिकाणी त्याचे शुटींग होणार आहे. वीर सावरकरांच्या या कथेचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते महेश व्ही मांजरेकर करणार आहेत.

चित्रपटाबाबत बोलताना, निर्माते संदीप सिंग म्हणाले, भारतात असे खूप कमी कलाकार आहेत जे आपल्या अभिनयाने लोकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण करु शकतात, रणदीप त्यापैकी एक आहे. वीर सावरकरांना भारतीय इतिहासातील सर्वात वादग्रस्त पात्र मानले जाते, त्यामध्ये मी फक्त रणदीपचाच विचार करू शकतो. वीर सावरकरांचे योगदान दुर्लक्षित करता येत नाही, मला आश्चर्य वाटते की आपल्या इतिहासाच्या पुस्तकात वीर सावरकरांचा उल्लेख का नाही?

तसेच दिग्दर्शक महेश व्ही मांजरेकर यांनाही यावर प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले की, आम्ही ज्या कथांकडे दुर्लक्ष केले होते ते सांगण्याची हीच योग्य वेळ आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हा असाच एक सिनेमॅटिक अनुभव असेल जो आपल्याला आपला इतिहास नव्याने जाणून घेण्यास भाग पाडेल.

महत्वाच्या बातम्या-
खायला भाकरही नव्हती पण इन्कम टॅक्सने छापा टाकताच निघाली १०० कोटींची मालकीण, वाचून हादराल
ब्रह्मोस मिसाईल पाकिस्तानात कोणाच्या चुकांमुळे पडले? आयएएफच्या तपासात झाले उघड
..तर मित्र असणं आवश्यक नाही, खेळाडूंच्या आपआपसातील वादावर गौतम गंभीरचे मोठे वक्तव्य

ताज्या बातम्या मनोरंजन राज्य

Join WhatsApp

Join Now