Share

त्यांनी कायदेशीर मार्ग स्विकारला आहे त्यामुळे.., पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर मांजरेकरांची प्रतिक्रिया

अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर आपल्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘नाय वरण-भात लोन्चा कोण नाही कोन्चा’ या चित्रपटामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. या चित्रपटात अल्पवयीन मुलांसोबत अश्लील दृश्ये दाखविल्यामुळे महेश मांजरेकर यांच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परंतु गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी आपण चित्रपटासोबत असल्याची भुमिका महेश मांजरेकर यांनी घेतली आहे. टाईम्स ऑफ इंडियाशी या विषयावर बोलताना मांजरेकर यांनी म्हटले आहे की, त्यांनी कायदेशीर मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे माझे वकील त्यानुसार उत्तर देतील. मी माझ्या चित्रपटाच्या बाजूने उभा आहे.

कारण चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन ने मंजुरी दिली आहे. त्यामुळे याबाबतीत मी आणखी काय सांगू?’ ज्यावेळी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. तेव्हाच चित्रपटावर आक्षेप नोंदवत राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहिले होते.

या पत्रात , NCW प्रमुखांनी ‘सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अल्पवयीन मुलांचा समावेश असलेल्या लैंगिक साहित्य प्रसारावर’ बंदी घालण्याची मागणी केली होती. तसेच महेश मांजरेकर यांनी ‘नाय वरण-भात लोन्चा कोण नाही कोन्चा’ या चित्रपटांच्या ट्रेलरमध्ये लैंगिकदृष्ट्या सुस्पष्ट सामग्री दर्शविली आहे. आणि त्यात अल्पवयीन मुले आणि महिलांना आक्षेपार्ह अवस्थेत दाखविण्यात आलं आहे’ असे म्हटले होते.

यानंतरच प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस न्यायालयाने ‘नाय वरन-भात लोन्चा कोण नाही कोन्चा’ चित्रपटावर दाखल झालेल्या तक्रारीवर चौकशी करण्याचे मुंबई पोलिसांना आदेश दिले. याप्रकरणी आता महेश मांजरेकर यांच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे मांजरेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

दरम्यान राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी चित्रपटाच्या ट्रेलरवर आक्षेप नोंदविला होता त्यानंतर हा चित्रपट १८ वर्षाखालील प्रेक्षकांनी बघू नये असे आव्हाहन महेश मांजरेकर यांनी केले होते. चित्रपट फक्त १८ वर्षावरील प्रेक्षकांसाठी असल्याने याला सेन्सॉर बोर्डाने ए प्रमाणपत्र दिल्याची माहिती मांजरेकर यांनी दिली होती.

महत्वाच्या बातम्या
..त्यावेळी माझं रक्त पिणारा मच्छर देखील तडफडून मरायचा, संजय दत्तचा तो व्हिडीओ पुन्हा चर्चेत
‘९३ च्या दंगलीनंतर बाळासाहेबांनी मुंबई वाचवली, पण आज मुलगा आरोपींना वाचवतोय’
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार
युद्ध सुरू! रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा; बाकी देशांनाही दिला ‘हा’ गंभीर इशारा

 

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now