२००८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘दे धक्का’ या सिनेमाने मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवले. आता १४ वर्षांनंतर याच चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या भागाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. (Why do Marathi people go to cinemas to watch South movies but not Marathi movies?)
सध्या मराठीमध्ये ऐतिहासिक विनोदी अशाप्रकारचे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. पण हे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहात जातात का? मराठी चित्रपटांची सध्याची परिस्थिती काय? याबाबत महेश मांजरेकर यांनी दे धक्का चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आयोजित कार्यक्रमात सांगितले आहे.
मराठीमध्ये चांगले चित्रपट येत नाहीत, असे काहीच नाही. पण प्रेक्षक आहेत कुठे? तुम्हाला तुमचं मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण ते मत मांडण्यासाठी आधी सिनेमागृहात जाऊन पिक्चर बघा तरी, असं महेश मांजरेकर म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, मराठी चित्रपट सिनेमागृहात जाऊन बघण्यासारखे नसतात, हे प्रेक्षकांनी ठरवूनच ठेवलं आहे. मराठीतील अनेक दिग्दर्शक- निर्माते चांगले विषय, चांगल्या कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू पाहतात.
अशा लोकांसाठी प्रेक्षकांचे न येणे खरंच वेदनादायी आहे. पण तेच प्रेक्षक आनंदाने दाक्षिणात्य चित्रपट पाहण्यासाठी जातात. दाक्षिणात्य चित्रपटांना मिळत असणाऱ्या यशाबद्दल माझं काहीच म्हणणं नाही.
त्यातले काही चित्रपट चांगल्या आशयाचे नसून सुद्धा चित्रपट निर्माते उत्तम जाहिरात करून चांगला पैसा कमावतात, असं महेश मांजरेकर यांनी म्हटलं आहे. त्यांचा दे धक्का सिनेमा ५ ऑगस्ट रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत असून त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
महत्वाच्या बातम्या-
क्लार्कच्या घरी अँटी करप्शनची रेड; आता सगळंच घबाड सापडेल या भितीने प्यायलं विष
Shivsena: मरेपर्यंत शिवसेनेसोबत राहणार, १४० शिवसैनिकांनी दिले वचन; उद्धव ठाकरेंना रक्ताने लिहिले पत्र
Bribe: छापा पडला तर घेतलेली लाच घेऊन पळाला अधिकारी, व्हिजिलेन्स टीमने पाठलाग करून पकडले