आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांचे लग्न झाले असून दोघांनीही त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. या जोडप्याचे लग्न होऊन केवळ एक दिवस झाला असला तरी अशा परिस्थितीत अनेक गोष्टी बाहेर येत आहेत. दरम्यान, एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, आलिया आणि रणबीर जेव्हा फेरे घेताना वचन घेत होते तेव्हा सातव्या वचनाच्या वेळी आलियाचे वडील महेश भट्ट यांनी त्यांना थांबवले.( Mahesh Bhatt stopped while taking 7th vows)
खरे तर असे घडले की, जेव्हा आलिया आणि रणबीर त्यांच्या लग्नाच्या विधीतून शपथ घेत होते, तेव्हा पंडितजींनी आलियाला वचन घेण्यास सांगितले की ती जे काही करेल ते पती रणबीरच्या परवानगीनेच करेल. महेश भट्ट यांनी यावर आक्षेप घेत त्यांना ते वचन घेण्यापासून रोखले. महेश भट्ट यांच्या या आक्षेपानंतर सर्वांच्याच चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
रिपोर्टनुसार, जेव्हा या वचनाची चर्चा झाली तेव्हा महेश भट्ट यांनी पंडितजींना थांबवले आणि त्यांना सांगितले की, मी स्वतः माझ्या पत्नीला हे वचन घेण्यास मनाई केली होती आणि माझ्या मुलीने असे कोणतेही वचन देऊ नये अशी माझी इच्छा आहे. आपल्या निर्णयांबाबत ती नेहमीच स्वतंत्र होती. यानंतर महेश भट्ट यांनीही आलियाला सांगितले की, तिने कोणते वचन द्यायचे आहे आणि कोणते नाही याचा विचार करूनच ठरवावे. यावर आलियानेही वडिलांचे म्हणणे मान्य केले.
याशिवाय पाहिलं तर महेश भट्ट यांनी आपल्या मुलीच्या लग्नात फारशी जबाबदारी घेतली नाही आणि सर्व काही आलिया आणि रणबीरने स्वतः हाताळले. यासोबतच महेश भट्ट यांनी लग्नाच्या बहुतांश विधींमध्ये विशेष रस दाखवला नाही. मात्र, या सगळ्याच्या पलीकडे उपस्थित असलेल्या सूत्राने असेही सांगितले की, सध्या या जोडप्याच्या रिसेप्शनबाबत कोणतीही चर्चा नाही. सर्वात आधी आलिया आणि रणबीर कुठेतरी हनिमूनला जाणार आणि तिथून परत आल्यानंतरच रिसेप्शन करायचे की नाही हे ते ठरवतील.
वास्तविक, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाचा अधिकृत संगीत सोहळा आयोजित करण्यात आला नव्हता. अनेक फंक्शन्स ठेवण्यासाठी दोघांकडे पुरेसा वेळ नव्हता. त्यामुळे दोघांनी अवघ्या 10 दिवसात लग्नाची सर्व तयारी करून पंजाबी रितीरिवाजानुसार लग्न उरकले. कोणत्याही प्रकारचा गाजा-वाजा न करता दोघांनी लग्न उरकल्याचे समजत आहे.
महत्वाच्या बातम्या-
ना साडी, ना लेहंगा, लग्नानंतर पुर्णपणे बदलली आलिया भट्ट, व्हिडीओ पाहून चाहत्यांनाही बसेना विश्वास
RRR चे डायरेक्टर एस एस राजामौलींवर संतापली आलिया भट्ट? डिलीट केल्या चित्रपटाशी संबंधित पोस्ट
आलियाच्या कलिऱ्यांमध्ये आणि मंगळसुत्रामध्ये दडलाय ‘हा’ खास आकडा, रणबीरशी आहे थेट संबंध
..त्यामुळे रणबीर-आलिच्या लग्नाला उपस्थित नव्हते काका मुकेश भट्ट आणि रॉबिन भट्ट, चर्चांना उधाण