Share

Mahesh Babu: महेश बाबूच्या डोक्यावरचं मायेचं छत्र हरपलं, आईचे झाले निधन, चाहत्यांनी ‘तो’ जुना व्हिडीओ केला शेअर

Mahesh Babu

Mahesh Babu, Indira Devi, Padmalaya Studio, Funeral/ काही महिन्यांपासून आजारी असलेल्या सुपरस्टार महेश बाबूची आई इंदिरा देवी यांनी 28 सप्टेंबर रोजी पहाटे 4 वाजता हैदराबाद येथे अखेरचा श्वास घेतला. या दु:खद घटनेबद्दल महेश बाबूचे चाहते सोशल मीडियावर शोक व्यक्त करत आहेत. या कठीण काळात ते स्टारला मजबूत राहण्यास सांगत आहे. चाहत्यांव्यतिरिक्त साऊथचा मेगास्टार चिरंजीवी यांनीही ट्विट करून महेश बाबूच्या आईच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अभिनेत्याने तेलुगू भाषेत ट्विट केले आहे, ज्याचे भाषांतर असे आहे की, ‘श्रीमती इंदिरा देवी यांच्या अकाली निधनाबद्दल ऐकून दुःख झाले. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. मी सुपरस्टार कृष्णा, भाऊ महेश आणि संपूर्ण कुटुंबासोबत माझ्या दुखद भावना व्यक्त करतो.

वृत्तानुसार, इंदिरा देवी यांचे पार्थिव सार्वजनिक श्रद्धांजलीसाठी पद्मालय स्टुडिओमध्ये ठेवण्यात येणार आहे. रात्री 9 ते 12 वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिवावर महाप्रस्थान येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. महेश बाबूच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला. स्टारच्या आणि त्याच्या आईसोबतच्या खोल नात्याबद्दल बोलताना चाहत्यांनी अभिनेत्याच्या आईसोबतचे अनेक जुने व्हिडिओही शेअर केले आहेत.

महेश बाबूचा एक व्हिडिओ चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये महेशने आपल्या आईबद्दल सांगितले आहे की, तो त्याच्या आईला देव मानतो. त्याने सांगितले की जेव्हा तो कठीण काळातून किंवा अडचणीतून जात असतो तेव्हा तो त्याच्या आईला भेटतो, तिच्यासोबत बसतो आणि कॉफी पितो आणि त्यानंतर त्याच्या सर्व समस्या दूर होतात.

महेश बाबू हा साऊथ इंडस्ट्रीतील टॉप कलाकारांपैकी एक आहेत. त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी त्याला ‘प्रिन्स ऑफ टॉलिवूड’ देखील म्हटले जाते. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. राजा कुमारुडू या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले, त्यांच्या पहिल्या चित्रपटासाठी महेश बाबू यांना दक्षिणेतील प्रसिद्ध नंदी पुरस्कार मिळाला.

महेश बाबू ‘मुरारी’, ‘बॉबी’, ‘ओक्कडू’, ‘अर्जुन’, ‘पोकिरी’, ‘बिझनेसमन’, ‘आगडू’, ‘ब्रह्मोत्सवम’, स्पायडर, भारत अने नेनू, महर्षी, सरिलेरू यासह अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसला आहेत. आज त्याची गणना इंडस्ट्रीतील महागड्या स्टार्समध्ये केली जाते. त्याचे जगभरात सर्वत्र चाहते आपल्याला पाहायला मिळतात.

महत्वाच्या बातम्या-
bacchu kadu : …अन् संतापलेल्या बच्चू कडूंनी कार्यकर्त्याच्याच कानशिलात लगावली; वाचा नेमकं काय घडलंय?
नवा चित्रपट फ्लॉप होताच महेश बाबूचा बदलला सूर; म्हणाला, बॉलीवूड चित्रपट करायला हरकत नाही
Mahesh Babu : दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूवर कोसळला दुःखाचा डोंगर; ‘या’ जवळच्या व्यक्तीचे झाले दुःखद निधन

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now