Share

हिंदी चित्रपट करून वेळ वाया नाही घालवायचा, बॉलिवूडला मी परवडणार नाही; साऊथ सुपरस्टारचे मोठे वक्तव्य

mahesh babu

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुपरस्टार महेशबाबू (Mahesh Babu) सध्या त्याच्या आगामी ‘सरकारू वारी पाटा’ या चित्रपटामुळे फारच चर्चेत आहे. १२ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यादरम्यान चित्रपटाच्या प्रमोशननिमित्ताने एका मुलाखतीत बोलताना महेशबाबूने त्याच्या हिंदी सिनेसृष्टीतील पदार्पणावर भाष्य केले. हिंदी सिनेसृष्टीला तो परवडणार नाही. त्यामुळे तो कधीच हिंदी चित्रपटासाठी आपला वेळ वाया घालवू इच्छित नसल्याचे महेशबाबूने म्हटले आहे.

इंडिया टुडेशी बोलताना महेशबाबूने म्हटले की, ‘मला बॉलिवूडमधून जास्त ऑफर्स मिळाले नाहीत. पण मला वाटत नाही की, मी कोणाला परवडणार आहे. मी अशा इंडस्ट्रीत काम करू इच्छित नाही जिथे मी लोकांना परवडतच नाही. जितका स्टारडम आणि आदर मला इथे दाक्षिणात्य सिनेसृष्टीत मिळाला आहे तेच माझ्यासाठी सर्वाधिक आहे. त्यामुळे मी कधीच माझी सिनेसृष्टी सोडण्याचा विचार केला नाही’.

महेशबाबूने पुढे म्हटले की, ‘मी केवळ चित्रपट करणे आणि ते यशस्वी होणे याबाबत विचार केला आहे. माझे स्वप्न आता पूर्ण होत आहेत. त्यामुळे आता मी यापेक्षा अधिक आनंदी माणूस होऊ इच्छित नाही’. यावेळी डिजिटल डेब्यू करण्याबाबत महेशने म्हटले की, ‘मी मोठ्या पडद्यासाठीच चांगला दिसतो. त्यामुळे मी ओटीटीवर येण्याचा विचार करू शकत नाही’.

दरम्यान, यापूर्वीसुद्धा एका मुलाखतीत बोलताना महेशबाबूने हिंदी चित्रपटात काम करण्याबाबत असे वक्तव्य केले होते की, त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. महेशने म्हटले होते की, मला हिंदी चित्रपट करण्याची काही गरज नाही. कारण तेलुगू चित्रपटसुद्धा जगभरात पाहिली जातात. आता देखील तेच घडत आहे. त्यामुळे मला विशेष करून हिंदी चित्रपटात काम करण्याची काही गरज वाटत नाहिये.

दरम्यान, महेशबाबूच्या आगामी सरकारू वारी पाटा या चित्रपटाचे दिग्दर्शन परशुराम पेटला यांनी केले असून १२ मे रोजी सिनेमागृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे महेशबाबूची मुलगी सितारा घट्टमनेनी याद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. या चित्रपटात पेनी नावाचे एक गाणं आहे. या गाण्यात सिताराने वडिलांसोबत डान्स केले आहे. तर या व्हिडिओला चाहत्यांनी खूप पसंती दिली.

याशिवाय महेशबाबू लवकरच बाहुबली फेम दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. बाहुबली त्यानंतर आता आरआरआर चित्रपटाला मिळालेल्या भरघोस यशानंतर राजमौली यांचा महेशबाबूसोबतचा हा चित्रपटदेखील हिट ठरेल का? हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. असे असले तरी महेशबाबूचे चाहते मात्र, या चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :
अमिषा पटेलने दिली संजय राऊत यांना ‘जादू की झप्पी’; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
आमिर खानच्या मुलीने बिकीनीवरच साजरा आपला वाढदिवस; बोल्ड फोटो पाहून लोकं म्हणाले..
लॉक अप जिंकल्यानंतर मुनव्वर फारुकीचे डोंगरी येथे जल्लोषात स्वागत, ट्रॉफी फिरवत म्हणाला..

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now