mahavitaran scheme for light bill | देशात दिवसेंदिवस महागाई वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे खर्च कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे पर्याय शोधत आहे. पेट्रोल डिझेलच्या महागाईमुळे लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहे. तर लाईटबिल जास्त असल्यामुळे काहीजण हे सौर उर्जेकडे वळत आहे.
सरकारही वेगवेगळ्या उपायोजना राबवताना दिसत आहे. अशातच केंद्र सरकारची सौर रुफटॉप योजना चर्चेत आली आहे. या योजनेअंतर्गत आलेल्या अर्जांची प्रक्रिया तातडीने पुर्ण करुन ग्राहकाला याचा लाभ घेता येईल,असे नियोजन प्रत्येक विभागीय कार्यालयाने करावे, असे आदेश महावितरणकडून देण्यात आले आहे.
तसेच या कामांमध्ये टाळाटाळ करणाऱ्या एजन्सींवर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते, असा इशारा महावितरणचे प्रकल्प संचालक प्रसाद रेशमे यांनी दिला आहे. तसेच प्रलंबित अर्जांवर कारवाई करा आणि ग्राहकांना मीटर उपलब्ध करुन द्या, असेही प्रसाद रेशमे यांनी म्हटले आहे.
रुफटॉप सौर उर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्राकडून सौर उर्जा निर्मिती यंत्रणेमुळे मासिक घरगुती वीजबिलात बचत होते. तसेच नेटमिटरिंच्या माध्यमातून महावितरणकडून वर्षाअखेर शिल्लक वीज विकत घेतली जाते. त्यामुळे ही योजना नागरिकांसाठी खुप फायद्याची असणार आहे.
ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावी, यासाठी हाऊसिंग सोसायटी आणि इतर ठिकाणी शिबिर घेऊन माहिती दिली जाणार आहे. झोपडपट्टी असलेल्या या भागात या योजनेची जनजागृती केल्यास वीजबिल कमी होईल आणि ग्राहकांनाही याचा फायदा होईल.
महावितरणच्या संकेतस्थळावर जाऊन या योजनेचा लाभ ग्राहकांना घेता येऊ शकतो. त्यासाठी त्यांना योजनेचा अर्ज भरावा लागणार आहे. सौर रुफटॉप यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतर दरमहा १०० युनिटपर्यंत वापर असलेल्या घरगुती ग्राहकांकडील एक किलोवॅट यंत्रणेमधून वीजबिलामध्ये सध्याच्या वीजबिलानुसार दरमहा ५५० रुपयांची बचत होईल.
महत्वाच्या बातम्या-
Eknath Shinde: ठाकरे कुटुंबियांवर टिका करणाऱ्या बंडखोर आमदारांना एकनाथ शिंदेंनी झापले; म्हणाले…
Shivsena: बंडानंतर शिवसेनेचा पहीला विजय; उद्धव ठाकरेंना साथ देत मतदारांनी शिंदेंना दिला दणका
Dipak kesarkar: नारायण राणेंनी आखला होता आदित्य ठाकरेंची बदनामी करण्याचा प्लॅन, केसरकरांचा गौप्यस्फोट