दिवाळीचा उत्साह शिगेला पोहचला आहे. घराघरात महिलांची फराळ तयार करण्याची लगबग सुरू आहे. लहान मुलांपासून ते वृद्ध नागरिकांमध्ये दिवाळी सणाचा आनंद पाहायला मिळत आहे. अशातच एक धक्कादायक बातमी समोर येतं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून तुमच्या देखील काळजाचा ठोका चुकेल.
दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण..! दिवाळी काळात विद्युत पुरवठा खंडित होऊ नये यासाठी दिवाळी असूनही महावितरणचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत. घरचा सण साजरा न करता महावितरणाचे कर्मचारी सर्वांची दिवाळी प्रकाशमय करण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत.
याच दरम्यान एक धक्कादायक बातमी घडली आहे. महावितरणमध्ये कार्यरत असणाऱ्या वरवटी येथील एका तरुणाचा विद्युत तारेला चिकटून मृत्यू झाला आहे. लाईनमन मेघराज व्यंकटी चाटे (वय, २८) असं मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ व्यक्त केली जातं आहे.
याचबरोबर कुटुंबियावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. काळजाचा ठोका चुकवणारी बाब म्हणजे, दोन महिन्यापूर्वीच मेघराज चाटे यांचा मोठ्या थाटात विवाह सोहळा पार पडला होता. आता त्यांच्या मृत्यूने अवघ्या दोन महिन्यांचा त्यांचा संसार उद्धवस्त झाला आहे.
वाचा नेमकं घडलं काय?
या घटणेबाबत मिळालेल्या महितीनुसार, आंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील तलावाशेजारी असलेल्या क्रांतीनगर फिडरमध्ये रविवारी दुपारी एक बिघाड झाला होता. दुरुस्तीसाठी मेघराज चाटे हा तरुण लाईनमन विद्युत खांबावर चढला होता.
आणि याच दरम्यान, बंद केलेला विद्युत पुरवठा अचानक सुरु झाल्याने मेघराज यांना अचानक विजेचा झटका बसला. त्यानंतर नागरिकांनी तातडीने विद्युत पुरवठा खंडित करून मेघराज यांना रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने आता हळहळ व्यक्त केली जातं आहे.
महत्वाच्या बातम्या-
सनी देओलच्या मुलाचा झाला गुपचूप साखरपुडा; काय आहे नेमकं यामागील कारण वाचा
Sunny Deol: सनी देओलच्या ‘चुप’ने बाकीच्या चित्रपटांना केलं ‘चिडीचुप’ पहिल्याच दिवशी केली विक्रमी कमाई
Sunny Deol: राहायला नव्हते घर, उपाशीपोटी काढले दिवस, अजूनही मला.. सनी देओलच्या अभिनेत्रीची कहाणी ऐकून डोळ्यातून पाणी येईल