Share

राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ ठरला खास,सुदेश भोसलेंच्या गाण्यासह ‘या’ गोष्टींचा होता समावेश

आज संपूर्ण देशभरात 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला गेला. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील राजपथावर प्रजासत्ताक दिनाचे संचलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या संचलनात जवळपास 9 मंत्रालयांचे आणि 12 राज्यांचे असे एकूण 21 चित्ररथ सहभागी झाले आहेत. यंदाच्या संचालनात महाराष्ट्रातील जैवविविधता मानके या विषयावर आधारित चित्ररथ सहभागी झाला होता.

राज्याच्या चित्ररथात साताऱ्यातील ‘कास’ पठार दाखवण्यात आले. अतिशय दिमाखात या चित्ररथाचे प्रदर्शन झाले. या चित्ररथाला प्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांनी आवाज दिला आहे. या चित्ररथाचे वैशिष्ट्य म्हणजे, या चित्ररथावर सातारा जिल्ह्यातील ‘कास’ पठारावरील फुले आणि प्राण्यांच्या प्रजातीचा समावेश करण्यात आला. कास पठाराचा चित्ररथावर समावेश झाल्याने साताऱ्यासाठी ही बाब भूषणावह ठरली आहे.

महाराष्ट्राच्या चित्ररथावर पाच’ जैविविधता मानकं’ होती. ज्यामध्ये राज्यासाठी अद्वितीय असलेल्या वनस्पती आणि प्राणी यांचा समावेश होता. चित्रपथावर सुमारे 15 प्राणी आणि 22 वनस्पती आणि फुले प्रदर्शित करण्यात आलेली होती. या चित्रपथावर एक विशेष गाणे लावण्यात आलेले होते, ज्याने सर्वांना आकर्षित केले. या गाण्याद्वारे झाडे लावा, झाडे जगवा हा विशेष संदेश दिला गेला.

https://twitter.com/dayakamPR/status/1486219458544906243?t=HAcOHVuj5o5C8FvzZTcLmQ&s=19

तसेच,या चित्ररथाची संकल्पना सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहसंचालक मीनल जोगळेकर यांची असून निर्मिती संचालक बिभीषण चावरे आहेत. महाराष्ट्राचा हा चित्ररथ नागपूरच्या शासकीय चित्रकला महाविद्यालयातून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी तयार केला होता. या कलावंतांनी तयार केलेल्या कलाकृतींमध्ये विविध प्रकारांचा समावेश आहे. खार, सरडा आणि महाकाय फुलपाखरू धातूपासून बनविण्यात आले होते. या कलाकृतींचे आकर्षक रंगकाम देखील याच तरुण कलावंतांनी केले आहे.

याआधी, 1980 मध्येही शिवराज्याभिषेक या विषयावरील चित्ररथाला पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला होता.1983 साली ‘ बैलपोळा’ या विषयावरील चित्ररथ सर्वोत्तम ठरला होता.1993 ते 1995 अशी सलग तीन वर्षे अनुक्रमे गणेशोत्सव, शताब्दी, हापूस आंबे आणि बापू स्मृती या चित्ररथांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला होता.

तर, 2015 मध्ये ‘पंढरीची वारी’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ साकारला होता. 2015 नंतर महाराष्ट्राच्या चित्ररथाने दोनदा प्रथम क्रमांक पटकावला होता. 2018 रोजी ‘शिवराज्याभिषेक’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ साकारला होता. यावेळी चित्ररथांनी पहिला क्रमांक पटकावला होता.

यावर्षी महाराष्ट्राच्या चित्ररथाला सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी नाकारण्यात आलेली होती. मात्र, केंद्र सरकारनं काही दिवसांतच आपला हा निर्णय मागे घेऊन महाराष्ट्राच्या चित्ररथाला राजपथावरील संचलनात सहभागी होण्याची परवानगी दिली.

इतर

Join WhatsApp

Join Now