10 एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रामनवमी साजरी होत असताना नाशिकमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका नराधामाने आपल्याच पत्नी आणि पाच वर्षांच्या मुलीला मारुन टाकले आहे. एवढेच करुन न थांबता त्याने या हत्येचा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना पाठविल्याचे कृत्य केले आहे.
रामनवमीच्या दिवसी अशी खळबळजनक घटना घडल्यामुळे संपूर्ण नाशिक शहर हादरले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी बलराज कुदळे आपली पत्नी अक्षदा आणि मुलगा शिवतेजसोबत श्रीरामपुर मधल्या दिघी इथे राहत होता. गेल्या अनेक दिवसांपासून पत्नी आणि आरोपीच्यात कौंटुबिक वाद सुरु होते.
त्यामुळे अक्षदा रागात माहेरी निघून गेली होती. परंतु राग शांत होताच ति काही दिवसांपूर्वीच सासरी आली होती. तिने आपल्या रोजच्या दिनक्रमालाही सुरुवात केली होती. मात्र दुसरीकडे आरोपी बलराजच्या डोक्यातील राग शांत झाला नव्हता.
म्हणून त्याने रामनवमीच्या दिवशी घरात कोणी नसताना पत्नीच्या डोक्यात कुदळ घातली. बलराजने केलेला वार इतका जबरदस्त होता की त्याच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला. इतके करुनही न थांबता बलराजने आपल्या मुलाला मारुन टाकण्याचा विचार केला. त्याने आपल्या मुलाला घराजवळ असलेल्या आंब्याच्या झाडाला दोरीने फाशी देऊन टाकली.
पोलिसांच्या तपासातून समोर आले की, बलराज आपल्या मुलाचा जीव जाईपर्यंत तिथेच थांबून होता. या घटनेचे त्याने व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. हे रेकॉर्डिंग त्याने आपल्या कुटुंबियांना आणि गावकऱ्यांना पाठविले. इतकेच नव्हे तर, बलराजने व्हिडीओ कॉल करत आपल्या मेहूण्याला पत्नी आणि मुलाचा मृतदेह दाखवला.
यावेळी तुझ्या बहिणीला आणि भाच्याला मारुन टाकलं, त्यांच्या मयताला ये असे बलराजने मेहूण्याला सांगितले. हे ऐकून त्याच्या पायाखालची जमिनच सरकली. सध्या या घटनेनंतर गावकरी हळहळ व्यक्त करत आहेत. तसेच आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पोलीसही या घटनेचा तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
‘एसटी कामगारांवर ही वेळ का आली?’, पवारांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी मराठी दिग्दर्शकाचा संतप्त सवाल
एकेकाळी विभूती नारायणच्या खिशात एक रुपयाही नव्हता, आता एका एपिसोडसाठी घेतोय तब्बल ‘एवढे’ पैसै
“राज नव्हे तर उद्धवच बाळासाहेबांचे वारसदार, ते आमच्यासोबत येत नाहीत याचा आम्हाला खेद”
भ्रष्टाचाराप्रकरणी सोमय्या पितापुत्रांच्या अटकेचा मार्ग मोकळा; कोर्टाने दिला ‘हा’ निर्णय