Share

”मनसे हा राजकीय पक्ष नसून गुंडाचा पक्ष, केवळ हिंदु मुसलमान दंगल घडविणे हेच उद्दिष्ट्य”

raj

सालाबादप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवर सभा घेतली. या सभेनंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राज ठाकरे यांच्या भाषणानंतर राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आपल्या भाषणात राज म्हणाले होते की, “माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती आहे. तुम्ही ईडी, इन्कम टॅक्सच्या धाडी टाकताय ना, पोलिसांना विचारा. झोपडपट्ट्यांतल्या मदरशांवर धाडी टाका. काय काय हाती लागेल, ते पाहा, अशी विनंती त्यांनी केली होती.

ते पुढे म्हणाले, “माझा प्रार्थनेला विरोध नाही, पण मशिदींवर लागलेले भोंगे उतरवावेच लागतील. ज्या मशिदीबाहेर भोंगे लागतील त्याच्यासमोर दुप्पट आवाजात स्पीकर लावायचे आणि हनुमान चालिसा लावायची. मी धर्मांध नाही, धर्माभिमानी आहे. धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का? बाहेरच्या देशांत दिसतात का?”, असे सवाल त्यांनी उपस्थित केले होते.

याचाच धागा पकडत रिपब्लिकन बहुजन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय घाटे यांनी थेट राज यांना आव्हान दिलं आहे. हिम्मत असेल तर ठाण्यातील मुंब्रा परिसरात राज ठाकरेंनी सभा घेऊन दाखवावी, असं थेट आव्हान दिलं आहे. ते याबाबत माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी मनसेवर जहरी टीका केला.

मनसेवर आरोप करताना त्यांनी म्हंटले आहे की, ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा राजकीय पक्ष नसून तो गुंडांचा पक्ष असल्याने केवळ हिंदू-मुसलमान दंगली घडविणे हेच त्यांचे उद्दिष्ट असल्याचा गंभीर आरोप विजय घाटे यांनी केला आहे. याचबरोबर डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या विरोधात मनसेचे कार्यकर्ते कार्य करत असून त्यामुळे समाजात दंगली उसळल्याची शक्यता असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, ठाण्यात आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एककिडे येत्या 9 तारखेला राज ठाकरे यांची ठाण्यात उत्तर सभा पार पडणार आहे. तर दुसरीकडे यावेळी सभेला निघालेल्या राज ठाकरेंची आम्ही गाडी अडवणार आहोत, त्यांना त्यांच्या वक्तव्याचा जाबही विचारणार आहोत, असं विजय घाटे यांनी म्हंटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
‘या’ पर्वतावर बनला आहे ओमचा आकार, दिवसरात्र येतो असा आवाज, जाणून घ्या जगप्रसिद्ध पर्वताचे रहस्य
आयुष्यात दोनच गोष्टी गरम हव्या, एक जेवण आणि दुसरी.., कंगनाच्या शोमध्ये अभिनेत्याची घसरली जीभ
..त्यामुळे राम गोपाल वर्मांचा संसार झाला उद्ध्वस्त, पत्नीने ‘या’ टॉपच्या अभिनेत्रीला केली होती मारहाण
संजय राऊतांनी ईडीचे केले समर्थन, ‘तो’ जुना व्हिडीओ दाखवत भाजप नेत्याने केली पोलखोल

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now