कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून राज्यातील शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळेच ग्रामीण भागातील शिक्षकांसह अनेक शिक्षण तज्ज्ञांनी सरसकट शाळा बंद करू नये, अशी मागणी केली होती. या दोन वेगवेगळ्या मतप्रवाहांवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी मोठं विधान केलं आहे. शाळा पुन्हा सुरू होणार की नाही, कधी सुरू होणार याबद्दल टोपे यांनी भाष्य केलं आहे.
ते याबाबत जालना येथे पत्रकरांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘सध्या कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लावलेले निर्बंधांचे तंतोतंत पालन करण्याचे मोठे आव्हान आहे. कोरोना संदर्भातील नागरिकांच्या मनातील भिती संपली आहे. मात्र, सर्वांनी कोरोनाबाबत सजग राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच लवकरच शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही स्पष्ट केले आहे.
तसेच पुढे बोलताना टोपे म्हणाले, ‘मला असं वाटतं, एकंदर रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचं प्रमाण कमी आहे, मुलांना करोनाची लागण होण्याचं प्रमाण कमी आहे. याबद्दल कॅबिनेट बैठकीतही भरपूर चर्चा झाली आणि या चर्चेतून ठरलं की आता एक १०-१५ दिवस शाळा बंदच राहतील. तोपर्यंत राज्यातली परिस्थिती पाहिली जाईल आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून विचार करून आणि १५ दिवसांनंतरची परिस्थिती पाहून शाळा सुरू करायच्या की बंद याविषयीचा निर्णय घेण्यात येईल.’
याचबरोबर शाळा सुरू करण्यासंदर्भात कॅबिनेटमध्ये ही चर्चा झाली आहे. लहान मुलांना संसर्ग होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र, शाळा सुरू करण्यासंदर्भात दोन मतप्रवाह असून यासंदर्भात पंधरा दिवसानंतर चर्चेअंती मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे टोपे यांनी जालना येथे बोलताना म्हटले आहे.
दरम्यान, लसीकरणाच्या सुरुवातील एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल बोलताना टोपे म्हणाले की, आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. आपण 90 टक्के लोकांना पहिला डोस दिला आहे. आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो. आपण 62 टक्क्यांपर्यंत लोकांना दुसरा डोस दिला आहे, असं टोपे म्हणाले.
‘दारूच्या दुकानांसह हॉटेल, रेस्टॉरंट व इतर आस्थापनांमध्ये गर्दी झाली तर त्यावर बंदी आणली जाईल, असा इशाराही टोपे यांनी काही दिवसांपूर्वी दिला आहे. देशात सर्वाधिक कोरोना बाधित महाराष्ट्रात आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने निर्बंध लागू केले आहेत. भविष्यात रुग्णालयांमध्ये भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या आणि ऑक्सिजनची मागणी वाढली तर यापेक्षाही अधिक कडक निर्बंध लागू करावे लागतील, असेही टोपेंनी म्हटले होते.
महत्त्वाच्या बातम्या
गोविंदाच्या नवीन गाण्याला नेटकऱ्यांनी केले ट्रोल, म्हणाले, ‘९० च्या दशकातून बाहेर या’
..त्यावेळी तुला ढसाढसा रडताना मी पाहीलय; विराटच्या राजीनाम्यानंतर अनुष्काने ओपन केल्या ‘त्या’ गोष्टी
“किरण मानेंनीच इतर कलाकारांना त्रास दिलाय, योग्यवेळ येताच..; मानेंविरोधात मनसे आक्रमक
या अभिनेत्याने रेखासोबत अंघोळ करण्याचा धरला होता हट्ट, अशी होती रेखाची प्रतिक्रिया