राज्यात पावसाचा हाहाकार सुरू आहे. सर्वत्रच वादळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. पश्चिम महाराष्ट्रासह, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. जोरदार कोसळल्या पावसामुळे बळीराजा चिंतेत आहे. तर काही भागात समाधानकारक पाऊस झाल्याने आनंदाचे वातावरण आहे.
अशातच आता पावसाबद्दल आणखी नवीन अपडेट हाती येत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून माहिती देण्यात आली आहे. हवामान विभागाने पुणे, रायगड, कोल्हापूर या जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याची तिव्रता कमी झाला आहे. याचबरोबर आजपासून बंगालच्या उपसागरातील तिव्रता कमी होण्याची शक्यता असल्याकारणामुळे पुणे, रायगड, कोल्हापूर जिल्ह्यात हवामान विभागाने अलर्ट देण्यात आला आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील वादळी स्थितीमुळे आता विदर्भात ढग साचण्यास हळूहळू सुरुवात झाली आहे. याचा परिणाम म्हणून अनेक भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये अनेक जिल्हे, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, तर बाकीच्या भागांत अतिशय हलक्या स्वरूपाचा पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. तर पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मागच्या 24 तासांत बुलढाणा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली होती. यामुळे आता शेतकरी शेतातील कामाला लागले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
गोविंदांना आरक्षण देण्याच्या निर्णयाला श्रीकांत शिंदेंचा विरोध; मुख्यमंत्र्यांना जाहीर इशारा देत म्हणाले…
इंदूरीकर महाराज पुन्हा अडचणीत; भडकलेल्या गावकऱ्यांचा थेट पोलिस ठाण्यात ठिय्या
‘वर्षातून एकदा दहीहंडी फोडण्याऱ्या गोविंदांना आरक्षण देण्यापेक्षा रोज साहसी खेळ करणाऱ्या डोंबाऱ्यांना आरक्षण द्या’
Mumbai : दहीहंडी उत्सवादरम्यान मुंबईत मोठी दुर्घटना; चार मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली; पहा व्हिडीओ






