Share

“उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून महाराष्ट्राला शनी लागला आहे” राणा दांपत्यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

सध्या महाराष्ट्रात भोंग्याच्या वादावरून राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिल्यामुळे शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

23 एप्रिल रोजी राणा दांपत्य मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करणार आहेत. परंतु त्यापूर्वीच राणा दांपत्य खार परिसरातील घरी दाखल झाले आहेत. त्यामुळे तणावपूर्ण स्थिती बघता पोलिसांनी राणा दांपत्याच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याला बॅरिकेटस लावले आहेत.

दुसरीकडे आपल्या भूमिकांवर ठाम राहत राणा दांपत्य महाविकास आघाडीवर जोरदार टीका करताना दिसत आहे. “उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून महाराष्ट्राला शनी लागला आहे. त्यामुळे राज्याच्या सुख शांतीसाठी आज मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठन करणारच” असा निर्धार रवी राणा यांनी केला आहे.

पुढे त्यांनी म्हणले आहे की, “मातोश्री हे आमचं हृदयस्थान आहे. बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहेत. त्या ठिकाणी जाऊन आज आम्ही हनुमान चालीसा वाचणार आहोत. शनिवारचा दिवस हा बजरंगबलीचा दिवस आहे. महाराष्ट्राच्या शांतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून राज्याला जो शनी लागलाय तो आम्हाला या ठिकाणी संपवायचा आहे.”

यानंतर, “संपूर्ण महाराष्ट्रात सुख, शांत असावी. महाराष्ट्राची उन्नती झाली पाहिजे या उद्देशाने हनुमान चालीसा वाचवण्यासाठी जर आम्हाला इतका विरोध केला जातोय. मराठी माणसाला हनुमान चालीसा वाचण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तेचा दुरुपयोग करुन करतायत” असे रवी राणा यांनी म्हणले आहे.

दरम्यान हनुमान चालीसा पठणाला सुरुवात करण्यापूर्वी राणा दांपत्याच्या घरातील एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओत राणा दांपत्य देवपूजा करताना दिसत आहे. पुढे याच व्हिडिओत रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या
“शिवसेनेसाठी आम्ही रक्ताचं पाणी केलंय, अजून हरणार नाही” ९२ वर्षीय आजीबाईंचा मातोश्रीबाहेर पहारा
यापुढे कुणी शिवसेनेच्या नादाला लागाल तर आपल्या गोवऱ्या स्मशानात रचून या; शिवसेनेची थेट धमकी
१७ वर्षांच्या मुलीने दिला बाळाला जन्म पण बाळाचा बाप अवघ्या १२ वर्षांचा; काय आहे नेमकी घटना? जाणून घ्या..
बिस्लेरीची अर्धी बाटली बंटी बबलीची फुलऑन फाटली; राणांच्या माघारीनंतर शिवसैनिकांचा तुफान जल्लोष

 

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now