खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. हनुमान चालिसा पठणाप्रकरणी मुंबई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच आता त्यांची प्रकृती ठिक झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.
नवनीत राणा यांना रुग्णालयातून डिस्चार्च मिळ्यानंतर त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे त्यांच्यावर कारवाई होणार का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. जामिनावर सुटल्यानंतर माध्यमांशी बोलण्यास न्यायालयाने मनाई केली असतानाही राणा दाम्पत्याने वक्तव्ये केली आहेत.
त्यामुळे याबाबत न्यायालयात जाणार असल्याचे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी म्हटले आहे. सशर्त जामिनावर बाहेर आलेल्या राणा दाम्पत्याने न्यायालयाच्या अटींचे उल्लघन केल्याचा खळबळजनक दावा सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केली. याविरोधात सोमवारी (आज) न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच त्यांनी हनुमान चालिसा पठणावरून वक्तव्य केलं. हनुमान चालिसा वाचणे जर गुन्हा असेल तर मी १४ वर्षे शिक्षा भोगण्यास तयार आहे. तरी देखील मी पुन्हा उभी राहीन. उद्धव ठाकरेंना माझे आव्हान आहे की त्यांनी माझ्याविरोधात कुठेही निवडणूक लढवून दाखवावी आणि जिंकून दाखवावे, असे आव्हान नवनीत राणा यांनी दिले.
वाचा सरकारी वकील प्रदीप घरत यांनी काय म्हटले आहे. याबाबत बोलताना प्रदीप घरत म्हणाले, “नवनीत राणा आणि रवी राणा यांना न्यायालयाने जी अट घातली होती की, त्यांनी गुन्ह्याशी संबधित कोणत्याही विषयावर माध्यमांसमोर बोलायचे नाही या अटी आणि शर्तीचे उल्लंघन केले आहे.’
‘आम्ही सोमवारी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊ. कारण अशा प्रकारची विधाने त्यांनी माध्यमांसमोर केल्यास त्यांना दिलेल्या जामिनाच्या अटीचे उल्लंघन समजण्यात येईल आणि जामीन रद्द समजण्यात येईल असे न्यायालयाने म्हटले आहे,’ असे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या
रणरणत्या उन्हात आदित्य ठाकरेंनी गावकऱ्यांसोबत खालीबसून केली चर्चा; म्हणाले, एकत्र काम करुया
“आता हे काय कोथळे काढतात? निवडणुकीत आम्हीच यांचे कोथळे काढू”, रावसाहेब दानवेंचा शिवसेनेवर पलटवार
रस्त्यावरच्या धार्मिक कार्यक्रमांना कायमची बंदी; योगी सरकारचा आणखी एक क्रांतीकारी निर्णय
ख्रिस गेलसोबत IPL मध्ये झालाय अन्याय, म्हणाला, मला वाईट वागणूक मिळाली म्हणून…