गेल्या अनेक महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. इंधन दरवाढ आणि महागाईवरून विरोधकांची ओरड सुरू होती. त्यानंतर आता केंद्र सरकारने महागाईवर सर्जिकल स्ट्राईक केला आणि काल पेट्रोल, डिझेलच्या किंमतीमध्ये कपात केल्याची घोषणा केली.
काल केंद्र सरकारने पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रतिलिटर 8 रुपये तर डिझेलवर 6 रुपयांनी कमी करीत आहोत, अशी घोषणा केली. त्यामुळे आता पेट्रोल 9.5 रुपये तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त होणार आहे. याशिवाय एलपीजी गॅस सिलेंडरवरही 200 रुपये अनुदान देण्याचा निर्णय केंद्राने दिला.
केंद्रापाठोपाठ आता राज्य सरकारने देखील मोठं पाऊल उचलल आहे. VAT मध्ये कपात करत ठाकरे सरकारने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्र शासनाने पेट्रोल आणि डिझेलचे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने २२ मेपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात अनुक्रमे २ रुपये ८ पैसे आणि १ रुपया ४४ पैसे प्रती लिटर कपात केली आहे.
तर या निर्णयामुळे राज्यावर अडीच हजार कोटींचा बोजा पडणार आहे. मागील अनेक महिन्यांपासून दर कमी कऱण्याची मागणी विरोधी पक्षांसह नागरिकांकडूनही होत होती. अखेर ठाकरे सरकारने करून दाखलव आहे. दुसऱ्यांदा केंदाने कपात केल्यानंतर राज्य सरकारनेही दर कपात केली.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, १६ जून २०२० ते ४ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे ७ रुपये ६९ पैसे आणि १५ रुपये १४ पैसे प्रती लिटर कर आकारात होते. मार्च आणि मे २०२० मध्ये केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी दरात अनुक्रमे १३आणि १६ रुपये अशी वाढ केली होती.
तर आता आज ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे वर्षाला सुमारे २५०० कोटी रुपयांचा भार तिजोरीवर पडणार आहे. तर दुसरीकडे दिलासादायक बाब महनेज केंद्र आणि राज्य सरकारने कमी केलेल्या करामुळे पेट्रोल ११ रुपये ५८ पैशांनी स्वस्त झाले आहे. तर डिझेलच्या दरात ८ रुपये ४४ पैशांनी स्वस्त झाले आहे. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
VIDEO: काचेच्या तुकड्यांपासून बनवलेला ड्रेस घालून उर्फी पोहोचली पार्टीत, युजर्स म्हणाले, ‘ही बसणार कशी?’
ब्राम्हण संघटनांनी घेतली शरद पवारांची भेट, केल्या ‘या’ तीन मागण्या; शरद पवार म्हणाले…
सोपा झेल सोडला आणि डीआरएसही नाही घेतला, चाहत्यांनी पंतचा घेतला खरपूस समाचार, म्हणाले..
भुल भुलैयासमोर चित्रपट फ्लॉप झाला तरी कंगनाने केले कार्तिक आर्यनचे अभिनंदन, म्हणाली…