केंद्र सरकारने महागाईवर सर्जिकल स्ट्राईक केला आणि शनिवारी पेट्रोल, डिझेलच्या किंमतीमध्ये कपात केल्याची घोषणा केली. केंद्र सरकारने पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रतिलिटर 8 रुपये तर डिझेलवर 6 रुपयांनी कमी करीत आहोत, अशी घोषणा केली. त्यामुळे आता पेट्रोल 9.5 रुपये तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त होणार आहे.
याशिवाय एलपीजी गॅस सिलेंडरवरही 200 रुपये अनुदान देण्याचा निर्णय केंद्राने दिला. केंद्रापाठोपाठ आता राज्य सरकारने देखील मोठं पाऊल उचलल आहे. VAT मध्ये कपात करत ठाकरे सरकारने नागरिकांना दिलासा दिला आहे. राज्य शासनाने २२ मेपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात अनुक्रमे २ रुपये ८ पैसे आणि १ रुपया ४४ पैसे प्रती लिटर कपात केली आहे.
सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे (आज) सोमवारी नागरिकांना आणखी दिलासा मिळेल असे वाटत होते. मात्र चित्र काहीस वेगळं पाहायला मिळालं. कालच्याच केंद्र सरकारने कमी केलेल्या दराने आज राज्यात पेट्रोल, डिझेल विक्री करण्यात येत आहे. याचाच अर्थ नागरिकांना कसलाही दिलासा मिळालेला नाहीये.
याचा आढावा घेण्यासाठी आज काही पत्रकारांनी पेट्रोल पंपाला भेट दिली. मात्र काहीस नकारात्मक चित्र समोर आलं. पेट्रोल आणि डिझेलचा भाव कमी झाला नसल्याचं दिसून आलं. आज मुंबईतील पेट्रोलपंपावरील पेट्रोलचे दर पाहता 111 रूपये 39 पैसे दिसून आले, तर डिझेलचा भाव 97 रुपये 32 पैसे इतका दिसून आला.
थोडक्यात सांगायच झालं तर, ठाकरे सरकारकडून जरी जनतेला दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला असला. तरी प्रत्यक्षात मात्र हे दर कमी झाले नाहीये. यामुळे नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जातं आहे. तर दुसरीकडे नेमकं यामागील गौडबंगाल काय? असा सवाल सध्या उपस्थित झालाय.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, १६ जून २०२० ते ४ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे ७ रुपये ६९ पैसे आणि १५ रुपये १४ पैसे प्रती लिटर कर आकारात होते. मार्च आणि मे २०२० मध्ये केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी दरात अनुक्रमे १३आणि १६ रुपये अशी वाढ केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
भयानक! कॉलेजमधून २०० फुटांवर ओढत नेले, नंतर चाकु भोकसून केला खुन; हत्येच्या कारणाने पोलिस हादरले
ग्राहकांशी वारंवार गडबड करणाऱ्या OLA, UBER ला सरकारने पाठवली ‘ही’ नोटीस, दिला मोठा दणका
शॉर्ट्स घालते म्हणून सुनवायचे लोकं, तीच बनली वर्ल्ड चॅम्पियन, वडिलांनी सांगितली संघर्षाची कहाणी
माधुरीच्या चाहत्यांना धक्का! अभिनय सोडून घेतला ‘हा’ निर्णय, वैयक्तिक आयुष्याबद्दलही केला खुलासा