राज्यात लॉकडाऊन लागू होणार नाही. मात्र, याबाबत निर्बंध कठोर होणार आहेत. आज राज्यमंत्री मंडळाच्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. दररोज राज्यात ओमिक्रोन बाधित रुग्णाची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्यातील शाळा या आधीच बंद करण्यात आली होत्या.
आता राज्यातील महाविद्यालये आणि परीक्षांच्या बाबतीत महत्वाचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबद्दल घोषणा केली असून राज्यातील सर्व अकृषी महाविद्यालये आणि तंत्रशिक्षण संस्था १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. सर्व विद्यापीठांनी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विजेची अनुपलब्धता, नेटवर्क कनेक्टिव्हिटीमुळे, विद्यार्थ्यांच्या कुटुंबात किंवा विद्यार्थी करोनाबाधित असतील तर त्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, याची दक्षता सर्व विद्यापीठांनी घेतली पाहिजे. खासगी विद्यापीठांनी देखील याच निर्णयाचं पालन करायला हवं”, असं ते म्हणाले.
मंगळवारी याबाबत सविस्तर बैठक झाल्यानंतर उदय सामंत यांनी हा निर्णय घेतला आहे. या बैठकीत राज्यात लॉकडाऊन करण्याची गरज नाही, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्याचवेळी कोरोना निर्बंध आणखी कठोर करण्याच्या निर्णयावर सर्वांचे एकमत आढवा बैठकीत झाले आहे. आता या बैठकीतील माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली जाईल. त्यानंतर बुधवारी संध्याकाळपर्यंत राज्य सरकारकडून नव्या निर्बंधाची नियमावली प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
निर्बंधांमध्ये वाढ होणार असली तरी लॉकडाऊन लागण्याची धास्ती संपली आहे. लॉकडाऊन लावल्यास राज्याचे अर्थचक्र थांबू शकते. राज्य सरकार हा धोका पत्कारायला तयार नाही. त्यामुळे सरकार अजूनही लॉकडाऊन लावण्याच्या मनस्थितीत नाही. मात्र, कठोर निर्बंध लावण्यात येणार आहेत. तशी नियमावली आज जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच केंद्र सरकारप्रमाणे ५० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवण्याची शक्यता आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट, सिनेमा गृहात उपस्थिती ५० टक्के होण्याची शक्यता आहे.





