Share

आषाढीची महापूजा मुख्यमंत्री शिंदे यांच्याच हस्ते होणार; निवडणूक आयोगाने दिली ‘या’ अटींसह परवानगी

राज्यातल्या नगरपालिका निवडणूका जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली आहे. अचारसंहितेमुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाढी एकादशीची विठ्ठलाची महापूजा करता येणार की नाही असा संभ्रम निर्माण झाला होता. विठ्ठलाच्या महापूजेसाठी पंढरपूर जाण्यासाठी शिंदे यांना निवडणूक आयोगाची परवानगी लागणार होती.

मात्र, आता हा संभ्रम दूर झाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तेच आषाढीची महापूजा पार पडणार आहे ,अशी बातमी समोर आली आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना पंढरपूर जाण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे उद्या म्हणजेच रविवारी विठ्ठलाची शासकीय महापूजा शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

राज्यात नगरपालिका निवडणूक जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली असून मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली होती. त्या विनंतीला निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे.

मात्र तीन अटींसह ती परवानगी देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सहा कार्यक्रमांना या अटींसह परवानगी देण्यात आली आहे. या अटीमध्ये, पूर्वनियोजित शासकीय कार्यक्रमांमध्ये कोणत्याही निधी विकास योजना, कार्यक्रमांची घोषणा करू नये.

कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यास हरकत नाही, पण त्या ठिकाणीही घातलेल्या अटींचे पालन करण्यात यावे.
तसेच वरील सर्व कार्यक्रमांसाठी आवश्यक त्या नियमानुसार परवानग्या घेण्यात याव्यात, या सर्व अटींचा समावेश आहे. या अटींचे पालन करून परवानगी देण्यात आली आहे.

माहितीनुसार, एकादशीच्या दिवशी पहाटे शासकीय महापूजा झाल्यावर पहाटे इस्कॉन आंतरराष्ट्रीय मंदिराचा भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे. तसंच सकाळी ११ वाजता सुंदर माझे कार्यालय, स्वच्छता दिंडी समारोप आणि दुपारी मुख्यमंत्री शिंदे हे शिवसेना पक्षाच्या मेळाव्यास हजेरी लावणार आहेत.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now