राजकीय वातावरण सध्या चांगलच तापलं आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते व माजी मंत्री महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी एक खळबळजनक वादा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. जानकर यांच्या या दाव्याने नक्कीच नवीन वादाला तोंड फुटणार असल्याच सध्या बोललं जातं आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस म्हणतात की, ‘आम्हाला मंत्रिपद दिलं.’ फडणवीसांच्या याचाच व्यक्तव्याचा धागा पकडत महाजन म्हणतात, ‘आमच्यावर मेहरबानी केली नाही. आम्ही युतीत होतो; आम्ही युती सोबत नसतो, तर फडणवीस साहेब, तुम्ही मुख्यमंत्री झाला असता का?, असा संतप्त सवाल जानकर यांनी उपस्थित केला आहे.
सातारा जिल्ह्यातील म्हसवडमधील पत्रकार परिषदेत याबाबत जानकर बोलत होते. यावेळी त्यांनी स्वबळाचा नारा दिला. सोबतच भाजपवर निशाणा साधला. याचबरोबर यावेळी बोलताना जानकर यांनी आगामी काळात देशाचा पंतप्रधान मीच होणार आहे, असा मोठा दावा केला.
पुढे बोलताना जाणकर म्हणाले, ‘आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समितीसह म्हसवड पालिकांच्या निवडणुका रासप स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी बोलताना केली. यामुळे आता महाजन यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
भाजपवर टीका करताना जाणकर म्हणाले, ‘भाजपनं ओबीसींशी दगाफटका केला आहे. काँग्रेसनही सत्तर वर्षे तेच केलं आहे. भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत,’ अशा शब्दात जाणकर यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. मात्र यावर अद्याप भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या नाहीये.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जाणकर यांनी ओबीसींची जनगणनेसाठी मागणी केली आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘लवकरात लवकर ओबीसींची जनगणना करण्याचा प्रयत्न करावा. तसेच केंद्राकडे जर ओबीसींचा डेटा असेल तर त्यांनी तो द्यावा, त्यामुळं आरक्षणाचा प्रश्न सुटू शकेल.’