Share

सायकलवरून दूध गोळा करत सुरू केला व्यवसाय; व्यवसायातून 50 हजार रुपयांचा नफा

paise

देशातील शेतकरी बांधव आता उत्पादनवाढीच्या अनुषंगाने शेती क्षेत्रात मोठा बदल करीत आहेत. शेती मध्ये दिवसेंदिवस होत असलेल्या बदलांमुळे शेतकरी बांधवांना चांगला फायदा मिळत आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो. यातून अनेकांना अधिक फायदा होताना पाहायला मिळत आहे.

आज आम्ही तुम्हाला अशीच एक यशोगाथा सांगणार आहोत. नोकरीला लाथ मारून एका व्यक्तीने दुग्ध व्यवसाय सुरू केला. या व्यवसायातून तब्बल महिन्याला 50 हजार रुपयांचा नफा मिळत आहे. ही अनोखी यशोगाथा वाचून तुम्हालाही देखील नक्कीच अभिमान वाटेल.

महादेव भोईटे असे या व्यक्तीचे नाव आहे. सुरुवातीला भोईटे हे दुसऱ्या दूध संकलन केंद्रावर कामाला होते. मात्र त्यांना नोकरी करताना समाधान मिळत नव्हते. व्यवसाय करण्याचा भोईटे यांनी निर्णय घेतला. त्यांनी नोकरीला लाथ मारली. विशेष बाब म्हणजे, सायकलवरून दूध गोळा करत भोईटे यांनी स्वतःच अस्तित्व निर्माण केलं.

अभिमानाची बाब म्हणजे, 2007 साली पृथ्वीराज दुग्ध संकलन आणि शीतकरण केंद्राची स्थापना किलज येथे करण्यात आली. आज पृथ्वीराज दुग्ध संकलन केंद्राच्या तब्बल 9 शाखा आहेत. त्याहून अभिमानाची बाब म्हणजे, भोईटे यांनी गावातील तरुणांना रोजगार देखील देण्यास सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पृथ्वीराज दूध संकलन केंद्राच्या मुख्य शाखेत एकूण 9 ते 10 युवक काम करतात. मिळालेल्या माहितीनुसार, खवा, पनीर, बासुंदी, यांसह अनेक पदार्थ या केंद्रात तयार केले जातात. विशेष बाब म्हणजे, या पदार्थांना बाजारात मिठी मागणी आहे.

दरम्यान, प्रतिदिन या संकलन केंद्रातून 200 ते 300 किलो खवा निर्यात केला जातो. भोईटे आज स्वत:च्या व्यवसायातून 50 हजार रुपयांचा नफा मिळवतात. याचबरोबर दूध गोळा करण्यासाठी भोईटे यांच्याकडे स्वत:च्या मालकीचे 5 वाहने आहेत. सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतं आहे.

महत्त्वाच्या बातम्या
‘एसटी बस नदीच्या पाण्यात नाही, तर…’, वाचा प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेला अपघाताचा थरार…
रामदास कदमांचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र! उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप करत म्हणाले…
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व्हीलचेअरवरून मतदानासाठी दाखल; सोशल मीडियावर हळहळ
महाराष्ट्रातील एसटी बसला मध्य प्रदेशात भीषण अपघात; अपघाताचा थरार वाचून उभा राहील अंगावर काटा

इतर ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now