मुंबई :गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू पुन्हा चालली आणि काँग्रेसचा सफाया झाला. भाजपने 1985 मध्ये काँग्रेसचा सर्वात मोठा विजयाचा विक्रम मोडला. 27 वर्षांनंतरही गुजरातमध्ये भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट आहे. गुजरातमधील 182 जागांपैकी भाजपने 150 हून अधिक जागा जिंकल्या आहेत.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे यांनी गुजरातच्या या ऐतिहासिक विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून अभिनंदन केले आहे. गुजरातचा विजय हा विक्रमी आणि ऐतिहासिक आहे.. याबद्दल मोदी आणि भाजपचे अभिनंदन करतानाच उद्धव ठाकरे यांनी मोदींचे अभिनंदन करतानाच महाराष्ट्राचे हायजॅक केलेले उद्योग फलद्रूप झाले आहेत, असा टोलाही लगावला.
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय होत असतानाच महाराष्ट्रातही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे गटाच्या संयुक्त सरकारला घेराव घालण्याची रणनिती महाविकास आघाडीचे घटक पक्ष बनवत आहेत.
त्यामुळे एकीकडे भाजप सर्वाधिक जागा जिंकत असल्याचे दिसत असताना दुसरीकडे महाराष्ट्रात भाजपसमोर आव्हाने वाढत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ बंगल्यावर महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत 17 डिसेंबरच्या मोर्चा बाबत चर्चा झाली आहे.
या बैठकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते भाई जगताप देवगिरी बंगल्यावर उपस्थीत होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे-फडणवीस सरकारला घेराव घालण्यासाठी महाविकास आघाडी मुंबईत भव्य मोर्चा काढणार आहे. 17 डिसेंबरपासून या महामोर्चाला सुरुवात होणार आहे.
जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा हा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार आहेत. खुद्द उद्धव ठाकरे यांनी तीन दिवसांपूर्वीच ही घोषणा केली होती. त्यानंतर आज पुन्हा महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेले वादग्रस्त वक्तव्य आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमाप्रश्नाबाबत मवाळ भूमिका घेतल्याचा आरोप करत महाविकास आघाडी मुंबईत भव्य मोर्चा काढणार असल्याची माहिती मिळाली आहे.
महत्वाच्या बातम्या
पंतप्रधान मोदींचा सल्ला! फक्त 20 हजारात सुरू करा हा व्यवसाय अन् कमवा दरमहा 4 लाखांचा नफा
हिमाचलमध्ये भाजपचा सुपडा साफ; काँग्रेसने इतक्या जागा जिंकल्या की घोडेबाजाराची संधीच ठेवली नाही
भाजपची दिल्लीतील १५ वर्षांची सत्ता उलथवत केजरीवालांनी उडवला मोदी शहांचा धुव्वा