राज्यात भाजपला डावलून शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. सत्तापालट झाल्याने बहुमत मिळून देखील भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले आहे. सरकारने जवळपास 2 वर्षे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात यशस्वी पूर्ण केली आहेत. (maha vikas aghadi is maharashtras political future not bjp says sanjay raut)
मात्र अजूनही आरोप – प्रत्यारोपांचे सत्र थांबलेले नाहीये. अशातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. ‘भाजपने स्वत:च अंधाऱ्या विहिरीत उडी मारली आहे. निराश मनाने राजकारण करतात त्यांच्या नशिबी शेवटपर्यंत निराशाच असते. यामुळेच काहीही झाले तरी महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, ‘काही झालं तरी महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री होणार नाही. महाराष्ट्रात पुढचे 25 -30 वर्ष तरी त्यांची सत्ता येणार नाही. तोपर्यंत भाजप राहिल की नाही माहीत नाही, असं राऊत यांनी स्पष्ट केलं. 2024मध्ये ज्या निवडणूक होणार आहेत, त्यातही दिल्लीतील चित्रं बदलून जाईल.’
याचबरोबर भाजपने आता महाराष्ट्र विसरून जावं आता. ठिक आहे 100 लोकं जिंकतील, 75 लोकं जिंकतील अजून काही करतील पण महाविकास आघाडी हेच या महाराष्ट्राचे भविष्य आहे, असा दावाही राऊत यांनी केला. राऊत यांच्या या डाव्यावर अजून तरी भाजपकडून प्रतिक्रिया आलेली नाहीये. मात्र भाजपच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, ‘आमच्या तिन्ही पक्षांनी जास्तीत जास्त नगराध्यक्ष निवडून आणण्यासाठी एक पत्रक जारी केले आहे. तीन पक्षांनी एकत्र येऊन ही भूमिका घेतली आहे. स्थानिक राजकारणाच्या नावाखाली अनेकदा भ्रष्ट हातमिळवण्यात होत असतात. युतीत असतानाही आमच्या काही लोकांनी केल्या होत्या. अशा प्रकारची मनमानी आता चालणार नाही. शिवसेनेकडून असं काही होऊ नये यासाठी आम्ही दक्षता घेत असल्याचे राऊत यांनी सांगितले.
तसेच ‘झुकेंगे नही’ हा पुष्पातील डायलॉग हा शिवसेनेच्या बाण्यावरून घेतला असावा. ‘झुकेंगे नही’ हा आमचा गेल्या 50 वर्षापासूनचा नारा आहे. संजय राऊतांचा तर तो नाराच आहे. कशाला झुकायचं? का झुकायचं? आमचे काही उमेदवार बाद झाले असतील पण आम्ही लढू, असा निर्धारही राऊत यांनी व्यक्त केला.
महत्त्वाच्या बातम्या
“महाविकास आघाडी ही मद्यविक्री विकास आघाडी; मंदिरात पाण्याऐवजी वाईन द्या”
सलमान अफजल तर मी छत्रपती शिवाजी महाराज, कोथळा बाहेर काढेन; बिचुकलेचे वादग्रस्त वक्तव्य
बिचुकलेने सलमानला दिली आता थेट धमकी; म्हणाला, सलमान अफजल खान तर मी..
१ फेब्रुवारीपासून बदलणार बँकिंगचे ‘हे’ महत्वाचे नियम, थेट ग्राहकांच्या खिशावर होणार परिणाम






